खूप काही

Tauktae Cyclone in Mumbai : मुंबईला धडकणार ‘तोक्ते’ वादळ, काय आहे त्याची कुंडली

गुजरात आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या पश्चिम किनारपट्टीवर एक संकट घोंगावत आहे.

Tauktae Cyclone in Mumbai : गुजरात आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या पश्चिम किनारपट्टीवर एक संकट घोंगावत आहे. याआधीही 2020 मध्ये निसर्ग चक्रीवादळाने आपलं रौद्र रुप मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील अनेक भागांना दाखवून दिलं होतं. आता त्याचप्रकारचं अजून एक वादळ येत्या काही दिवसात अरबी समुद्रात निर्माण होणार आहे. (Tauktae Cyclone to hit Mumbai coast, Meteorological Department)

मुंबई, पालघर, कोकण, गोवा यांच्या किनारपट्टीला हे वादळ धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

‘तौत्के’ चक्रीवादळ (Tauktae cyclone) असं या वादळाचं नाव आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेलं हे चक्रीवादळ प्रत्येक वेळेस अधिकाधिक सक्रीय होत आहे. याचा दर तासाला वेग वाढत असल्याने किनारपट्टीच्या अनेक भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (What is the history of ‘Tokte’ storm that will hit Mumbai

कसं निर्माण झालं हे वादळ
अरबी समुद्राच्या लक्षद्वीपमधील कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे तोक्ते चक्रीवादळ निर्माण झालं आहे. या चर्कीवादळाचा वेग काही तासांत वाढत आहे. हे वादळ वेगाने गुजरातच्या दिशेने वाटचाल करत असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्याआधी ते वादळ गोवा आणि महाराष्ट्राच्या सिमेला धडकणार आहे.

कोकणाला धक्का बसणार
काही तासात हा धोका महाराष्ट्रातील कोकण भागाला बसण्याची शक्यता आहे. पोलघरलाही याचा काही प्रमाणात बसू शकतो. गुजरातकडे हे वादळ जाताना महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात 15 मे ते 17 मेपर्यंत येणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments