आपलं शहर

mumbai tauktae cyclone update:मुंबईतल्या वृक्षवधाला जबाबदार कोण? भाजप करणार पालिकेविरुद्ध गुन्हा दाखल

वृक्ष छाटणीसाठी अक्षम्य विलंब केल्यामुळे मुंबई शहरातील हजारो मोठ्या आणि प्राचीन वृक्षांना मुंबईकर मुकले आहेत.

mumbai tauktae cyclone update:तोक्ते चक्रीवादळामुळे(Cyclone tauktae) मुंबईत 2,364 वृक्ष उन्मळून पडल्याच्या तक्रारी पालिकेला(BMC) प्राप्त झाल्या आहेत. वादळानंतर 48 तास उलटूनही रस्त्यावर पडलेल्या वृक्षांच्या फांद्या हटविण्यात आलेल्या नव्हत्या याबाबत उद्यान विभागाकडे विचारणा केली असता हे काम करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती झाली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. (Who is responsible for tree felling in Mumbai)

वृक्ष छाटणीकरिता कंत्राटदाराच्या नियुक्तीचा प्रस्ताव वृक्ष प्राधिकरण समिती(TA-Tree authority)समोर 18 मार्च 2021 पासून आजतागायत प्रलंबित असून याला जबाबदार कोण? प्रत्यक्ष वृक्ष छाटणीच्या प्रस्तावास मंजुरी देऊनही वृक्ष छाटणी केली गेली नाही.येत्या आठवड्याभरात वृक्ष छाटणीस प्रत्यक्षात सुरूवात नाही केली तर महानगरपालिकेवर सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपा उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल असा गंभीर इशारा भारतीय जनता पक्षाने दिला आहे.

महानगरपालिकेच्या बेजबाबदार वर्तनाला भाजपाचा तीव्र निषेध

तौक्ते चक्रीवादळामुळे मुंबईमध्ये अनेक ठिकाणी घर पडणे, पाणी साचणे तसेच झाडे पडण्याच्या घटना घडल्या आणि यावरून मुंबईत आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झालेली आहे.वृक्ष प्राधिकरण समितीने वृक्ष छाटणीसाठी अक्षम्य विलंब केल्यामुळे मुंबई शहरातील हजारो मोठ्या आणि प्राचीन वृक्षांना मुंबईकर मुकले आहेत. (BJP will file a case against the BMC)

वृक्ष प्राधिकरणाने वेळीच वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदार नियुक्त केला असता तर मार्च-एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्ष छाटणी झाली असती. त्यामुळे झाडाचा भार हलका झाल्याने कितीतरी झाडे कोसळलीच नसती. पालिकेच्या या बेजबाबदार वर्तनाचा तीव्र निषेध भारतीय जनता पक्षाच्या(BJP) सदस्यांनी स्थायी समितीत केला असून येत्या 7 दिवसात वृक्ष छाटणीस घेतली नाहीत तर आम्ही पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना यांच्या विरोधात न्यायालयात सदोष वृक्षवधाचा गुन्हा दाखल करू असा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

महानगरपालिकेविरुद्ध थेट न्यायालयात जाणार पर्यावरण प्रेमी

तोक्ते चक्रीवादळाला सामोरे जाण्यासाठी पालिका प्रशासन सज्ज असल्याचा केवळ देखावा करते. तोक्ते चक्रीवादळात पालिका प्रशासनाच्या मनुष्यबळाच्या मर्यादा स्पष्ट झाल्यामुळे पालिका प्रशासनाच्या आणि सत्ताधारी शिवसेनेच्या (Shivsena) विरोधात भाजप(BJP) न्यायालयात जाण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे मुंबईत सुरू असणाऱ्या काँक्रिटीकरणाला पालिका परवानगी देते कशी? आणि मुंबईच्या नासाला महानगरपालिका जबाबदार असल्याने पालिकेच्या विरोधात न्यायालयात जाऊ असा इशारा पर्यावरण प्रेमींनी दिला आहे.(Environmentalists will go directly to court against the BMC)

पालिकेविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची भाजपची तयारी

एकीकडे भाजप सत्ताधारी शिवसेना आणि महानगरपालिका प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी करत असताना पर्यावरणप्रेमी देखील सेनेच्या विरोधात आहेत. तर येत्या काही दिवसात पावसाळा येत असून यानुसार महानगरपालिकेची कशी तयारी आहे हे पाहणं महत्वाच असेल.(BJP is ready to file a case against the BMC)

 

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments