खूप काही

Mumbai Cricket team 2021 : कोण होणार मुंबई टीमचा कोच? वाचा का आहे या टीमला इतकं महत्त्व?

मुंबई क्रिकेट संघाने एका मुलाखतीत सांगितले की, मुंबईच्या टीमसाठी 9 उमेदवारांनी दिला अर्ज.

Mumbai cricket team 2021 : भारतीय क्रिकेटर वसीम जाफर, सईराज बहुतुले आणि अमोल मजुमदार यांनी मुंबई क्रिकेट टीममध्ये (mumbai cricket team) मुख्य कोच पदासाठी अर्ज दिला आहे. याशिवाय 1983 च्या वर्ल्डकप जिंकणाऱ्या टीममधील बलविंदर सिंह संधू यांनी देखील या पदासाठी अर्ज केला आहे.

जाफर हे उत्तराखंड टीमचे मुख्य कोच होते. परंतु काही मतभेदांमुळे त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. आयपीएलसाठी पंजाब किंग्स टीमचे ते कोच होते. साईराज बहुतुले यांनी आठ वनडे खेळली असून. ते मागील दोन वर्षे गुजरात टीमचे देखील कोच होते तर त्यावेळी कुलकर्णी हे मुंबईचे कोच होते.
(Who will be the coach of Mumbai team?)

कुलकर्णी यांनी विदर्भ आणि छत्तीसगड येथे देखील कोच म्हणून काम केले आहे. तर मागील वर्षी मुंबईचे कोच म्हणून अमित पगनिस यांना नियुक्त केले होते. परंतु टीमच्या खराब प्रदर्शनामुळे त्यांनी हे पद सोडले होते. त्यामुळे एमसीएने विजय हजारे ट्रॉफी साठी रमेश पवार यांना मुख्य कोच बनवले ज्यामुले टीम चॅम्पियन बनू शकली.

मुंबई क्रिकेट टीम
मुंबई क्रिकेट टीम ही सर्वाधिक यशस्वी टीम आहे. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर, रोहित शर्मा, विजय मर्चंट, पॉली उमरीगर, दिलीप वेंगसरकर यासारखे अनेक महान खेळाडू मुंबई टीम मधून प्रसिद्ध झाले आहेत. मुंबई संघ हा मुंबईस्थित क्रिकेट संघ असून तो भारतीय प्रीमियर लीगमधील आठ संघांपैकी एक आहे. हा संघ वानखेडे स्टेडियम मैदानांवर आपले सामने खेळतो.(what is mumbai cricket team?)

या उमेदवारांनी केला अर्ज
मुंबई क्रिकेट संघाने एका मुलाखतीत सांगितले की, मुंबईच्या टीमसाठी 9 उमेदवारांनी अर्ज दिला आहे. यात बलविंदर सिंह संधू, वसीम जाफर, साईराज बहुतुले, अमोल मजूमदार, सुलक्षण कुलकर्णी, प्रदीप सुंदरराम, नंदन फडनीस, उमेश पटवाल आणि विनोद राघवन यांचा समावेश आहे.(These candidates applied for the post of Mumbai team coach)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments