खूप काही

World Cup 2021:भारतातच होणार 2021 चा T-20 वर्ल्ड कप, पाहा कोणती ठिकाणं

भारतात T-20 वर्ल्ड कप होण्याची शक्यता, मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या ठिकाणांची निवड...

World cup 2021:भारतीय क्रिकेट नियामक मंडळाची (BCCI) आज एक महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत बीसीसीआयचे अधिकारी आयपीएल, टी-20 आणि वर्ल्ड कप क्रिकेटविषयी चर्चा करणार आहेत.आज होणार्‍या बैठकीत विश्वचषक स्पर्धेसाठी ठिकाण भारतातच ठेवण्याचा बीसीसीआय प्रयत्न करणार आहे परंतू भारतातील कोरोनामुळे बीसीसीआयच्या अडचणीत भर पडली आहे. (World Cup 2021: India will host the 2021 T-20 World Cup)

बीसीसीआयने विश्वचषक स्पर्धेसाठी (world Cup) प्रथम 9 ठिकाणांची घोषणा केली आहे. परंतु खेळाडूंनी जास्त प्रवास केला तर कोरोनाचा धोका वाढेल. खेळाडू अधिकाधिक वेळ बायो बबलमध्ये सुरक्षित राहावे आणि त्यांना जास्त प्रवास करावा लागु नये, म्हणून बीसीसीआय मुंबई, पुणे आणि अहमदाबाद या तीन ठिकाणी विश्वचषक आयोजित करण्याचा विचार करीत आहे. (World Cup likely in India, Mumbai, Pune and Ahmedabad selected …)

तसेच वर्ल्ड कप भारतात आयोजित न केल्यास बीसीसीआय युएईला (UAE) बॅकअप म्हणून सादर करणार आहे. युएईमध्ये तीन मैदाने आहेत जिथे कोरोनाच्या कचाट्यात मागील वर्षी आयपीएल यशस्वीरित्या पार पडला.

खरं तर आयपीएल पुढे ढकलल्यामुळे बीसीसीआयच्या अडचणी प्रत्यक्षात वाढल्या आहेत. आयपीएलच्या 14 व्या सत्रात बीसीसीआयने जबरदस्त सुरुवात केली होती.मुंबई व चेन्नई येथे कोणत्याही प्रकारचा त्रास न घेता ही स्पर्धा 20 दिवस चालली. पण खेळाडूंनी दिल्ली आणि अहमदाबाद गाठताच दोन्ही ठिकाणचे अनेक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर आयपीएलचे 14वे सत्र पुढे ढकलण्यात आले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments