आपलं शहर

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी :राज्यपाल भगत सिंह कोश्यारी मुंबई विद्यापीठाला धडक भेट, केल्या अनेक सुचना

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी :विद्यापीठातील इमारतींना यथाशीघ्र ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबद्दल राज्यपालांच्या अधिकाऱ्यांना सूचना

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी : राज्यपाल  भगत सिंह कोश्यारी मुंबई विद्यापीठाला धडक भेट, केल्या अनेक सुचना
विद्यापीठातील इमारतींना यथाशीघ्र ना-हरकत प्रमाणपत्र देण्याबद्दल राज्यपालांच्या अधिकाऱ्यांना सूचना
राज्यपाल कोश्यारी यांनी आज (30 जून रोजी) मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसराला भेट दिली. तेथील विविध विभाग आणि इमारतींची पाहणी यावेळी करण्यात आली. त्यानंतर विद्यापीठातील अधिकारी आणि पालिका अधिकाऱ्यांशी बोलताना त्यांनी काही सुचना केल्या आहेत.

मुंबई विद्यापीठाच्या कलिना परिसर येथे विविध विभागांच्या इमारती बांधून पूर्ण आहेत. मात्र ना-हरकत प्रमाणपत्राशिवाय त्या सुरु करण्यात आल्या नाहीत. ही राष्ट्रीय संपदेची नासाडी आहे, असे नमूद करून इमारतींमधील त्रुटी दूर करून विद्यापीठाला इमारतींच्या वापराबाबत नाहरकत आणि भोगवटा प्रमाण पत्र लवकर देण्याच्या सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज महानगरपालिका आणि अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विद्यापीठातील विविध प्राधिकरणांच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीत उपयोगात नसलेल्या पडीक इमारती आणि वापरात नसलेल्या इमारती यांबाबतदेखील सविस्तर माहिती देण्याच्या सूचना राज्यपालांनी विद्यापीठाला दिल्या आहेत.

कलिना परिसर येथे मुंबई विद्यापीठातर्फे सुरु असलेले नवीन परीक्षा भवन, ग्रंथालय भवन, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि नवे मुलींचे वसतिगृह यासोबतच अनेक योजना यावेळी राज्यपालांच्यासमोर सादर करण्यात आल्या.

राज्यपालांनी यावेळी डॉ. आंबेडकर भवन, नॅनो सायन्स आणि नॅनो टेकनॉलॉजी केंद्र, इन्क्युबेशन फॉर डेव्हलपिंग आंत्रप्रेन्युअरशिप अँड स्टार्ट अप केंद्र, हरित तंत्रज्ञान भवन, स्कुल ऑफ बेसिक सायन्सेस, नवे परीक्षा भवन आणि जवाहरलाल नेहरू ग्रंथालय येथे भेट दिली, तसेच प्रयोगशाळा आणि ग्रंथालयांचीही पाहणी केली.
कुलगुरू पेडणेकर यांनी राज्यपालांचे विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरची प्रतिकृती भेट देऊन स्वागत केले. बैठकीला प्रकुलगुरू रवींद्र कुलकर्णी, प्रभारी कुलसचिव बळीराम गायकवाड तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख व अधिसभेचे सदस्य उपस्थित होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments