कारण

55 Years Of ShivSena : मराठी शिवेसेनेचा 54 वर्षांचा थरारक संघर्ष; वाचा बुलंद तोफेचा कारनामा

19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती, जाणून घ्या शिवसेनेची 54 वर्षांची ऐतिहासीक कामगिरी...

55 Years Of ShivSena: शिवसेना हा महाराष्ट्रातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. सर्वांनाच माहीत आहे की, शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. 19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना करण्यात आली होती. तिथपासून आतापर्यंत शिवसेनेची 55 वर्षांची ऐतिहासीक कामगिरी आपण पाहणार आहोत.

मार्मिकची स्थापना

‘मार्मिक’ हे एक मराठी भाषेतील व्यंगचित्र असणारे साप्ताहिक आहे. हे साप्ताहिक 1960 साली बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईतून प्रकाशित केले होते. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली होती, तरी देखील मुंबईमध्ये मराठी माणसावर अन्याय चालू होता. परंतु या अन्यायावर मार्मिकने वाचा फोडली. महाराष्ट्रात येऊन मराठी माणसांचा अनादर करणाऱ्यांवर बाळासाहेब ठाकरे यांनी व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली. या साप्ताहिकातून शिवसेनेचा जन्म झाला.(Establishment and function of Marmik)

शिवसेनेची स्थापना

महाराष्ट्रात अनेक सुविधा होत्या, पण मराठी माणसाला ती सुविधा मिळत नव्हती. महाराष्ट्रात अनेक उद्योगधंदे होते, तरीदेखील मराठी माणूस बेरोजगार होता. महाराष्ट्रात पैसा असूनदेखील मराठी माणूस गरीबच राहिला. त्यामुळे ठाकरे यांनी मराठी माणसासाठी शिवसेनेची स्थापना केली. ‘ 80 टक्के समाजकारण 20 टक्के राजकारण’ असे त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी वक्तव्य केले होते.(Establishment of Shiv Sena)

images 8

19 जून 1966 रोजी शिवसेनेची स्थापना करण्यात आली, 30 ऑक्टोबर रोजी शिवसेनेचा पहिला मेळावा शिवाजी पार्क येथे संपन्न झाला. अनेक लोकांनी याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिवाजी पार्कमधील या मेळाव्यात 5 लाखहून अधिक लोकांचा सहभाग होता.(founder of shivsena)

राजकारणात प्रवेश

1967 साली ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून शिवसेनेने राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर एका वर्षाने शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेत जागा मिळाली. यानंतर शिवसेनेची शाखा प्रसिद्ध झाली. मराठी माणूस त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेनेकडे धाव घेऊ लागला. परंतु 1969 साली झालेल्या सीमा वादावरून बाळासाहेब ठाकरे यांना अटक केली गेली. (Shiv Sena’s entry into politics)

शिवसेनेचे पहिले आमदार

5 जून 1970 साली कम्युनिस्ट नेते कृष्णा देसाई यांची हत्या झाली. त्यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण हादरले. त्यानंतरच्या झालेल्या पोटनिवडणुकीमध्ये शिवसेनेचा विजय होऊन, शिवसेनेचे पहिले आमदार वामनराव महाडिक झाले. (Shiv Sena’s first MLA).

शिवसेनेची कारकीर्द आणि पालिकेत महापौर

1971 मध्ये शिवसेनेने पहिली निवडणूक लढली आणि या साली डॉ. हेमचंद्र गुप्ते हे शिवसेनेचे पहिले महापौर झाले. 1972 साली विधानसभेत प्रमोद नवलकर यांनी प्रवेश केला, तर 1973 मध्ये ठाण्याचे महापौर म्हणून सतीश प्रधान यांची नेमणूक करण्यात आली आणि त्यानंतर 1975 साली आणीबाणी जाहीर करण्यात आली. तेव्हा शिवसेनेने आणीबाणीला पाठिंबा दिला होता. (Shiv Sena’s career and the mayor of the municipality)

images 10

शिवसेनेचे पहिले मुंबईतील महापौर गुप्ते होते. त्यानंतर मुंबईमध्ये शिवसेनेचे अनेक महापौर झाले. सध्या मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आहेत. परंतु 1996 पासून शिवसेनेचेच महापौर मुंबईमध्ये आहे.(Gupte was the first Shiv Sena mayor of Mumbai.)

शिवसेनेची युती

शिवसेनेने काँग्रेसबरोबर अनेक वेळा मैत्री ठेवली होती. 1980 साली शिवसेनेने काँग्रेसला मदत केल्याने शिवसेनेला विधानपरिषदेवर दोन जागा देण्यात आल्या. 1984 मध्ये भाजपबरोबर शिवसेनेने युती केली. परंतु युती तुटल्याने ‘कमळाबाई आम्हाला सोडून गेली’ असे वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांनी केले.(Shiv Sena and Congress alliance)

परंतु 1980 मध्ये भाजप आणि शिवसेना यामध्ये युती होऊन ती युती 25 वर्षे टिकली. त्यानंतर 2014 साली शिवसेना आणि भाजप वेगळे झाले आणि विधानसभेच्या निवडणुका लढल्या. त्यानंतर 2019 मध्ये शिवसेना आणि भाजप यांची युती निवडणुकीनंतर तुटली.(Shiv Sena alliance)

शिवसेनेचे मुख्यमंत्री

शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री 1995 सली मनोहर जोशी झाले. भाजप आणि शिवसेना युतीची पहिल्यांदाच सत्ता महाराष्ट्रात आली. मनोहर जोशीनंतर काही काळासाठी नारायण राणे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा दिला गेला. त्यामुळे युतीचे तिसरे मुख्यमंत्री भाजपचे देवेंद्र फडणवीस झाले.(Chief Minister of Shiv Sena)

शिवसेना सोडणारे नेते

शिवसेनेतील छगन भुजबळ, नारायण राणे यांनी शिवसेनेला कायमचा राम राम केला. त्याचबरोबर राज ठाकरे यांनी देखील शिवसेना सोडून, स्वतःचा पक्ष स्थापन केला. हेमचंद्र गुप्ते, गणेश नाईक, राम जेठमलानी, चंद्रिका कोनिया यांसारख्या अनेक नेत्यांनी शिवसेनेला रामराम ठोकला. (Leaders leaving Shiv Sena)

शिवसेनेच्या वाघाचे निधन

17 नोव्हेंबर 2012 रोजी मुंबईतील मातोश्री या निवासस्थानी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. निधन झाल्याने पक्षाची सर्व जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर आली. त्याचबरोबर उध्दव ठाकरे शिवसेनेचे प्रमुख आणि सामनाचे संपादक झाले परंतु मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची नेमणूक झाल्यानंतर, सामनाची सर्व जबाबदारी रश्मी ठाकरे यांना देण्यात आली. (Balasaheb Thackeray passes away)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments