खूप काही

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम मोठ्या ग्रुपकडे | Navi Mumbai Airport |

महाराष्ट्र सरकारने बुधवारी ठाणे-रायगड भागातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम मोठ्या ग्रुपकडे सोपवले आहे.

Navi Mumbai Airport : महाराष्ट्र सरकारने बुधवारी ठाणे-रायगड भागातील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (Navi Mumbai International Airport) काम अदानी विमानतळ होल्डिंग लिमिटेडकडे (Adani Airport Holding Limited – AAHL) सोपण्याची मान्यता दिली आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अध्यक्षतेखालील राज्य मंत्रिमंडळाने आयएएचएल सार्वजनिक-खाजगी कंपनीला भागीदारी (पीपीपी) प्रकल्प म्हणून आयकॉनिक ग्रीनफील्ड विमानतळासाठी नवीन सवलती दिल्या आहेत.

इंटरनेशनल एयरपोर्ट लिमिटेडच्या (International Airport Limited) माध्यमातून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम जाणार होते. परंतु गेल्या वर्षी हेच काम अदानी एयरपोर्ट होल्डिंग्स लिमिटेड (AAHL) ने ताब्यात घेतले आणि त्याला नागरी उड्डाण संचालनालय, विमानतळ प्राधिकरण, सेबी, सीसीआय आणि शेवटी सिडकोने मान्यता दिली. (Adani Group works on Navi Mumbai Airport)

नवी मुंबईच्या प्रोजेक्टमुळे उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांनी एक रेकॉर्ड बनवलं आहे. AAHL मुंबई, नवी मुंबई, अहमदाबाद आणि लखनऊसारख्या अनेक प्रमुख विमानतळांवर चालणारे सर्वात मोठे खाजगी विमानतळ ऑपरेटर म्हणून अदानी ग्रुपची ओळख झाली आहे.

2023-24 मध्ये विमानतळ सुरू?

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 1,160 हेक्टर क्षेत्रावर बांधले जात आहे. 2023-2024 मध्ये या विमानतळावरून उड्डाणे सुरु होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील वर्षात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय दोन्ही उड्डाणांसाठी देशाचे सर्वात मोठे विमानतळ म्हणून नवी मुंबईची ओळख होईल, हे नक्की.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments