आपलं शहर

xII Board Exam cancelled : देशासह CM ठाकरेंनीही मानले PM मोदींचे आभार, निर्णयाचं स्वागत…

पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचे आभार मानले.

Mumbai : करोनाच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देशात खूप धुमाकूळ घातला आहे. सध्याच्या परीस्थितीत देशाच्या वेगवेगळ्या भागात करोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरीही संकट अजूनही पूर्णपणे टळलेलं नाही. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र(PM Modi) मोदी यांना धन्यवाद दिले आहेत.

मुख्यमंत्र्यांनी(CM Thackeray) परवाच आपल्या लाईव्ह संबोधनातून 12वी आणि अशाच काही महत्त्वाच्या परीक्षांविषयी योग्य निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली होती. करोनाचा संसर्ग अजूनही वाढत असल्याने दहावी व बारावीसारख्या परीक्षा रद्द करण्याची मागणी पालकांकडूनही नेहमी येत होती. मुख्यमंत्र्यांनीदेखील यासंदर्भात आपले म्हणणे मांडले होते. यानंतर केंद्र सरकारकडून सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.याच दरम्यान, राज्यातील दहावीच्या परीक्षा न घेता मुल्यांकनाच्या आधारे विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच घेतला आहे.

राज्य बोर्ड बारावीच्या परीक्षेबाबत काय निर्णय घेणार?

महाराष्ट्र बोर्डाकडून घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, मात्र बारावीबद्दल अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. मात्र केंद्राने बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातही आता तशाच हालचाली सुरू असल्याचे संकेत राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड(Varsha gaikwad) यांनी दिले आहे.

‘करोनाची सध्याची परिस्थिती पाहता मुलांवर याचा होणारा परिणाम तसेच परिक्षेच्या या अवस्थेमुळे विद्यार्थ्यांच्या मनात तणाव निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत परीक्षेऐवजी पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा. केंद्र सरकारने देशपातळीवर याबाबत एकसुत्र धोरण निश्चित करावे ही मागणी महाराष्ट्र शासनाने केली होती. या मागण्यांचा विचार करून केंद्रसरकारने CBSE बारावीची परीक्षा रद्द करण्याचा घेतलेला निर्णय हा निश्चितच आहे. शैक्षणिक जीवनातील बारावीची परीक्षा ही महत्त्वाची पायरी असली तरीही सध्याची परिस्थिती पाहता विद्यार्थ्यांचे आरोग्य व सुरक्षा ही आपल्या सर्वांची प्राथमिकता असली पाहिजे. यापुढे महाराष्ट्र शासन देखील महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल,’ अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments