फेमस

Amazon Prime Video : मुंबई सागा’ ते ‘कर्णन’, TOP 5 चित्रपटांची अमेझॉनवर धम्माल, पाहा काय आहे खास…

कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत

Amazon Prime Video : कोरोनामुळे मनोरंजन क्षेत्रात अनेक बदल होत आहेत. लॉकडाऊनमुळे अनेक चित्रपट थेट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाले आहेत आणि काही होणार आहेत. ज्याला प्रेक्षकांकडून खूप प्रतिसाद मिळत आहे. हे चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मवर खूप पसंत केले जात आहेत आणि दर आठवड्याला काही नवीन चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. (Amazon Prime Video Mumbai Saga to Karnan TOP 5 movies on Amazon, what’s special)

2021 च्या सुरूवातीस कोरोना रुग्णांमध्ये घट झाल्यावर थिएटर सुरू करण्यात आली आणि काही चित्रपटगृहे सुरुही करण्यात आली होती, मात्र त्यानंतर सर्वकाही पुन्हा बंद करण्यात आलं होतं.

थिएटरमध्ये प्रदर्शित झालेले चित्रपट कदाचित बॉक्स ऑफिसवर चांगला गाजावाजा करू शकला नसला तरी आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर त्यांना चांगलीच पसंती मिळत आहे. आता अशाच काही अमेझॉन प्राइमवर (Amazon Prime Video) प्रदर्शित झालेल्या पाच चित्रपटांबद्दल पाहाणार आहोत.

सायना
बॅडमिंटनपटू सायना नेहवालवर आधारित सायना हा सायना हा चित्रपट अमेझॉन प्राइमवर रिलीज झाला आहे. हा चित्रपट यापूर्वी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, पण कोरोनामुळे तो बॉक्स ऑफिसवर जास्त दिवस टिकू शकला नाही. परिणीतीच्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर या चित्रपटातील अभिनयाला खूप पसंती मिळाली असून आता हा चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर धमाल करत आहे. (Saina Amazon Prime Video)

मुंबई सागा
अमोझोन प्राईम व्हिडीओवर ‘मुंबई सागा’ने धम्माल करून सोडली आहे. सत्य घटनेवर आधारित आणि त्यात जॉन इब्राहिमसारखा तगडा कलाकार या चित्रपटात असल्याने हा चित्रपट ओटीटीवर नवा विक्रम करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Mumbai Saga Amazon Prime Video)

वंडर वूमन 1984
वंडर वूमन 1984 हा चित्रपट या आधी थेअटरमध्ये प्रदर्शित झाता होता मात्र कोरोनामुळे थेअटर बंद झाले आणि हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करावा लागला, यावेळेस वंडर वूमन 1984 ला प्रषेकांनी डोक्यावर उचलून घेतलं आहे. अनेक विक्रम वंडर वूमनने आपल्या नावावर केल्याचंही म्हटलं जातय. (Wonder Woman 1984 Amazon Prime Video)

कर्णन
कर्नाटकातल्या तिरुनवेल्ली भागात घडलेल्या हिंसाचारावर ही एक सत्य घटना चित्रीत केली आहे. थुथनकुडीच्या कोडियांकुलम जातीच्या हिंसाचारावर ही कथा मांडण्यात आली आहे. मुख्य तमिळ भाषेत असलेला चित्रपट इतर भाषेतही चांगली कमाई करत आहे. धनुष, लाल, योगी बाबू, नटराज सुब्रमण्यम आणि रशिया विजयन अशा धाकड कलाकारांनी या चित्रपटाला चार चांद लावले आहेत. पहावयास मिळणार आहेत. लॉकडाऊनच्या काळात जनतेसाठी घरबसल्या मनोरंजन उपलब्ध होणार असून याला जास्तीत जास्त प्रतिसाद मिळेल हे नक्कीच. (Karnan – Dhanush Amazon Prime Video)

दृश्यम 2
अमेझॉन प्राइमवर मोहनलालचा मल्याळम चित्रपट दृश्यम 2 सर्वांच्या पसंतीस पडत आहे. दृष्यम चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. आता लवकरच या चित्रपटाचा हिंदी रिमेकही तयार होणार आहे. दृश्यम 2 मध्ये अजय देवगनदेखील मुख्य भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. (Drishyam 2 Hindi Amazon Prime Video)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments