Amazon sale live :ब्रांडेड फ्रीझ, एसी, मायक्रोवेव्ह आणि बऱ्याच गोष्टींची बंप्पर ऑफर
जूनपर्यंत ही ऑफर्स चालणार असल्याची माहितीही अमेझॉनने दिली आहे.

Amazon sale live : जर आपण इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करण्याचा विचार करीत असाल, तर हा काळ आपल्यासाठी आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरू शकतो. कारण Amazon ने अनेक ऑफर्सची घोषणा केली आहे. अमेझॉनने जाहीर केलेल्या ऑफर्समध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त किंमतीत मिळणार आहेत. 25 जून ते 29 जूनपर्यंत ही ऑफर्स चालणार असल्याची माहितीही अमेझॉनने दिली आहे.
एअर कंडिशनर :
Amazon ने नवीन एसी खरेदीवर 40 टक्के सूट दिली आहे. Voltas, LG आणि Samsung अशा अनेक कंपन्यांचे AC तुम्ही कमी किंमतीत खरेदी करू शकता. विक्री दरम्यान तुम्ही 22, 499 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर स्प्लिट एसी आणि विंडो एसी फक्त 18, 390 रुपयांत खरेदी करू शकता.
मायक्रोवेव्ह ओव्हन :
Amazon ने नवीन मायक्रोवेव्ह ओव्हन खरेदीवर 40 टक्के सूट दिली आहे. यावेळी नो कॉस्ट ईएमआयदेखील देण्यात आली आहे. यावेळी अनेक कंपन्याचे ओव्हन खरेदी करू शकतात. विक्रीदरम्यान तुम्ही सोलो मायक्रोवेव्हच्या सुरूवातीची किंमती 4,449 रुपये आणि कन्व्हेक्शन मायक्रोवेव्ह फक्त 7,930 रुपयात खरेदी करू शकता.
डिशवॉशर :
Amazon नवीन डिशवॉशर्सच्या खरेदीवर 45 टक्के सवलत दिली आहे. यावेळी नो कॉस्ट ईएमआयदेखील देण्यात येत आहे. यावेळी Bosch, IFB आणि LG सारख्या कंपन्यांचे डिश वॉशर खरेदी करू शकता. विक्री दरम्यान आपण डिशवॉशर सुरूवातीची तिची किंमत 19,999 रू आहे.
रेफ्रिजरेटर :
नवीन रेफ्रिजरेटर खरेदीवर Amazon मोठ्या प्रमाणात सवलत देत आहे. यावेळी नो कॉस्ट ईएमआयदेखील देण्यात येत आहे. यावेळी Bosch, IFB आणि LG कंपन्याचे रेफ्रिजेटर आपण अतिशय उत्तम दरात खरेदी करू शकतो. विक्री दरम्यान आपण रेफ्रिजरेटर 6,790 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीवर खरेदी करू शकता. त्याचबरोबर एनर्जी एफिशिएंट रेफ्रिजरेटरची किंमत 13,790 रुपये असणार आहे. यावेळी अनेकांना एक्सचेंज ऑफरदेखील मिळू शकणार आहे.
Finally the most awaited smartwatch of the year is now on sale. Pick your #MiWatchRevolveActive with SpO2 monitor, Built in Alexa, 117 sports mode and more before it’s gone! #AmazonSpecialshttps://t.co/BlDQH7cU9Y pic.twitter.com/mnBUCAds65
— Amazon India (@amazonIN) June 25, 2021