खूप काही

Andheri station redevelopment: मुंबईतल्या अंधेरी स्टेशनचा होणार कायापालट, जाणून घ्या काय आहेत नव्या सुविधा…

अंधेरी स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम भारतीय रेल्वे विकास निगम लिमिटेडने हाती घेतले आहे.

Andheri station redevelopment: नेहमीच प्रवाशांनी तुडुंब भरलेल्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणजेच अंधेरीचे रेल्वे स्टेशन, तर आता सतत प्रवाशांची गर्दी असलेल्या या अंधेरी स्टेशनच्या पुनर्विकासाचे काम भारतीय रेल्वे विकास निगम लिमिटेडने हाती घेतले आहे.

कोण घेणार स्टेशनच्या पुनर्विकासाची जबाबदारी?

भारतीय रेल्वे विकास निगम मंडळाने (ISRDC)अंधेरी स्टेशनचा पुनर्विकास हा दोन टप्प्यांमध्ये करायचे ठरविले आहे. तर या स्टेशनच्या पुनर्विकासासाठी एकूण 4.31 एकर एवढे क्षेत्रफळ लागणार असून त्यातील 2.1 एकरवर पहिल्या टप्प्यामध्ये आणि उर्वरित 2.20 एकर जागेवर दुसऱ्या टप्प्यात काम केले जाईल. (Who will be responsible for the redevelopment of Andheri station?)

अंधेरी रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी भारतीय रेल्वे विकास मंडळाने 218 कोटींचा निधी मंजूर केला आहे,त्याचप्रमाणे स्टेशनच्या डिझाईन, फायनान्स,ऑपरेटर आणि ट्रान्सफर मॉडेल या सर्व गोष्टींचे नियोजन भारतीय रेल्वे स्टेशन मंडळ करणार असल्याची माहिती मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिली. (Mumbai’s Andheri station will be transformed, find out what the new facilities are …)

कशा प्रकारे होणार अंधेरी स्टेशनचा कायापालट?

अंधेरी स्टेशन हे जवळ जवळ 21,843 स्क्वेअर मीटरमध्ये बनवले जाणार आहे. स्टेशनच्या पुनर्विकासानंतर तो सगळे फ्लाय ओव्हर पूल आणि रेल्वे स्टेशन बरोबरच मेट्रो स्टेशनला देखील एकत्रित करेल. (How will Andheri Station be transformed?)

पुनर्विकासानंतर स्टेशनवर होणाऱ्या गर्दीला कमी करण्यासाठी प्रवेश,ड्रॉप ऑफ, पिकअप या सगळ्या सुविधा वर्सोवा (versova) मार्गावर उपलब्ध केल्या जातील. त्याचसोबत सीएसएमटी आणि चर्चगेट स्टेशनवर सूर्यप्रकाश आणि पावसाचे पाणी दोघांपासून बचाव करण्यासाठी तयार केलेल्या छतांप्रमाणे अंधेरी स्टेशन वरही छत तयार करण्यात येणार आहेत.

पुनर्विकासानंतर अंधेरी स्टेशन नव्या स्मार्ट स्टेशनमध्ये मोडले जाणार असल्यामुळे स्टेशनची रचना ही ग्रीन बिल्डींग धोरणावर अवलंबुन असेल. त्याचप्रमाणे संपूर्ण स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेरादेखील लावण्यात येतील. या सर्व आधुनिक सुविधा उपलब्ध झाल्यामुळे रेल्वे प्रवाशांचा प्रवास हा सुखकर होईल हे नक्की.

तसेच येणाऱ्या काळात अंधेरी स्टेशननंतर दादर (Dadar) , कल्याण (Kalyan) , ठाकुर्ली (Thakurli) , वांद्रे (Bandra) , सीएसएमटी (CSMT), बोरिवली स्टेशन्सचादेखील पुनर्विकास करण्याचा निर्णय रेल्वे विकास मंडळाने घेतला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments