Anil Deshmukh Case :अनिल देशमुखांचा मोठा स्कॅम समोर, मुलगाही सामील, ED ची वेगळीच माहिती
Anil Deshmukh Case :मनी लाँड्रिंग अंतर्गत अनिल देशमुख प्रकरणात ईडीने मुंबईसह नागपूरमध्ये छापा टाकला आहे

Anil Deshmukh Case :मनी लाँड्रिंग अंतर्गत अनिल देशमुख प्रकरणात ईडीने मुंबईसह नागपूरमध्ये छापा टाकला आहे. नागपूरच्या एका ट्रस्टमध्ये कोट्यावधी रुपये जमा करण्याच्या आरोपाखाली अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेशचीही होणार असल्याची चर्चा होत आहे.
अनिल देशमुख आणि त्यांच्या साथीदारांविरूद्ध वसुलीच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातच ईडीच्या हाती आणखी काही महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत. त्यानंतर अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख आणि त्यांच्या जवळच्या माणसांवर तपासाची टांगती तलवार लटकली आहे. देशमुख कुटुंबाच्या देखरेखीखाली बऱ्याच कंपन्या आणि ट्रस्ट चालवल्या जात असल्याचे तपासात समोर आले आहे.
अनिल देशमुख यांच्या कुटुंबाच्या थेट नियंत्रणाखाली अशा 11 कंपन्या आहे, आशी माहिती ईडीला मिळाली आहे. तसेच अशा 13 कंपन्या आहेत ज्या अनिल देशमुख यांच्या कुटुंबाशी संबंधित लोक चालवतात; पण अप्रत्यक्षपणे अनिल देशमुख यांचे कुटुंब त्यांच्यावर नियंत्रण ठेवते, अशी माहितीही समोर आली आहे.
बर्याच कंपन्या इतरांच्या नावे
देशमुख कुटुंब इतर लोकांच्या नावाने कंपन्या चालवत आहेत, त्यांच्यामार्फत या कंपन्यांचे थेट नियंत्रण देशमुख कुटुंबाच्या ताब्यात होते. जेव्हा ईडीने विक्रम शर्मा नावाच्या डमी दिग्दर्शकाकडे चौकशी केली, तेव्हा या दिग्दर्शकाने अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांचे नाव घेतले आणि ऋषिकेश देशमुख यांनी आपली कंपनी “कुबिक्स हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेड” स्थापित करण्यासाठी पैसे दिल्याचे सांगितले.
वाझेचा जबाब
अनिल देशमुख यांचे खासगी स्विय सहाय्यक प्रकाश रमणी यांनीही ईडीला सांगितले की ज्या कंपन्यांची माहिती ईडीकडे आली आहे, अशा सर्व कंपन्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे देशमुख कुटुंबाच्या नियंत्रणाखाली आहेत. 100 कोटी रुपयांच्या वसुलीच्या प्रकरणात ईडीने सचिन वाझेचे स्टेटमेंटही नोंदवले आहे. यासह काही बार आणि रेस्टॉरंट मालकांचीही स्टेटमेंट्स नोंदवण्यात आले आहेत. ज्यात असे दिसून आले आहे की मुंबईच्या झोन 1 ते झोन 12 मध्ये येत असलेल्या सर्व पोलीस ठाण्यांतर्गत बार आणि रेस्टॉरंट्सकडून 4 कोटी 70 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. फेब्रुवारीमध्ये सचिन वाझे यांनी अनिल देशमुख यांचे पीए कुंदन शिंदे यांच्याकडे हे पैसे सोपवण्यात आल्याचे जबाबात म्हटलं आहे. कुंदन यांना सध्या ईडीने अटक केली आहे.
बनावट कंपन्यांचा वापर
ईडीच्या तपासणीत आणखी एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. नागपूरस्थित श्री साई शैक्षणिक संस्था, ज्यांचे अध्यक्ष अनिल देशमुख आहेत, तसेच त्यांचे कुटुंबातील बरेच सदस्य या संस्थेचे विश्वस्त आहेत. अटक केलेले कुंदनदेखील या संस्थेचे सदस्य आहेत. चौकशीत असे आढळले की काही काळासाठी या संस्थेला 4 कोटी 18 लाख रुपये मिळाले आहेत. या संस्थेच्या बँक खात्यात जमा करणाऱ्या या संस्थेला पैसे देणार्या कंपन्यांचा शोध ईडीने घेतला, तेव्हा कळले की या कंपन्या दिल्लीत आहेत, पण केवळ कागदावर आहेत. म्हणजेच या कंपन्यांचा फक्त रोख व्यवहारसाठी वापर केला जात होता, ज्यास सेल कंपन्या म्हणतात.
ऋषिकेश देशमुखंवर आरोप
तपासादरम्यान या सेल कंपन्यांचे मालक सुरेंद्र जैन आणि वीरेंद्र जैन यांची ईडीने चौकशी केली. चौकशीत असे समजले की त्याच्याशी नागपुरातील एका व्यक्तीने संपर्क साधला होता आणि श्री साई शैक्षणिक संस्थेला रोख रकमेच्या रूपात देणगी देण्याचे सांगितले होते. हवालामार्गे ही रोकड नागपूरहून दिल्लीला पाठविण्यात आली होती आणि त्यानंतर या सेल कंपन्यांच्या माध्यमातून श्री साई शैक्षणिक संस्थेला देणगी म्हणून 4 कोटी 18 लाख रुपये मिळाले. ईडीनुसार, हे सर्व अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांच्या देखरेखीखाली घडत होतं.