खूप काही

Antilia bomb scare: एन्टिलिया प्रकरणात संशयित प्रदीप शर्मांना अटक, NIAने थेट घरावर टाकला छापा…

संतोष शेलार यांच्या चौकशी दरम्यान त्यांनी प्रदीप शर्मा यांचा एन्टीलिया स्फोटक प्रकरणाशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे.

Antilia Bomb Scare: मनसुख हिरेन हत्याकांड (Mansukh hiren case) आणि एन्टिलिया स्फोटक प्रकरणातील (Antilia bomb scare case) चौकशी दरम्यान एनआयएने (NIA-National investigation agency) आणखी एक संशयित आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान एनआयएच्या पथकाने शिवसेना नेते आणि माजी एन्काऊंटर स्पेशालिस्ट (Former encounter specialist) प्रदीप शर्मा यांच्या घरी छापा टाकला.

मंगळवारी फेडरलच्या दहशतवादविरोधी एजन्सीने (Antiterrorism Agency) संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर लावलेल्या ‘जिलेटिन स्टिक्स’ (Geletin Stick) पुरवल्याप्रकरणी अटक केली होती.या प्रकरणात नुकतेच अटक केलेल्या संतोष शेलार यांच्या चौकशी दरम्यान त्यांनी प्रदीप शर्मा यांचा ॲन्टीलिया स्फोटक प्रकरणाशी संबंध असल्याचा खुलासा केला आहे.(Antilia bomb scare: Antilia case suspect Pradip Sharma arrested, NIA raids house …)

संतोष शेलार यांनी चौकशीदरम्यान आणि प्रदीप शर्मा (Pradip Sharma) यांचे नाव घेतल्याने एनआयएने गुरुवारी सकाळी प्रदीप शर्मा यांच्या निवासस्थानी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले आहे.

प्रदीप शर्मा यांच्याव्यतिरिक्त शेलार यांनी आणखी दोन साथीदारांची नावे घेतली आहेत आणि त्यांचीही प्रकरणात चौकशी केली जाईल. या सर्व मुद्द्यांवर शर्मा यांची चौकशी केली जाईल तसेच हिरेन बेपत्ता होण्याच्या दोन दिवस अगोदर शर्मा यांनी 2 मार्च रोजी दक्षिण-मुंबई कार्यालयात त्यांची भेट घेतली होती. शर्मा यांना त्यांच्या भेटीचे कारण सांगण्यास सांगितले जाईल, असेही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments