खूप काही

Antilia bomb scare case: एन्टिलिया स्फोटक प्रकरणात तिसर्‍या पोलिस अधिकार्‍याला अटक,तातडीने पदावरून काढून टाकण्याचा आदेश जाहीर …

एप्रिल महिन्यात सुनील माने यांना एनआयएने अटक केली होती.सेवेतून काढून टाकले गेलेले माने हे मुंबई पोलिसांचे तिसरे अधिकारी आहेत

Antilia bomb scare case :मुंबई पोलिस निरीक्षक सुनील माने यांना 2 एप्रिल रोजी मुकेश अंबानी यांच्या एन्टिलिया (Antilia) या घरापासून 300 मीटर अंतरावर स्फोटकांनी भरलेल्या स्कॉर्पिओ कारच्या संदर्भात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National investigation agency-NIA) अटक केली होती. एन्टिलिया प्रकरणातील मुख्य आरोपी सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांना पदावरून काढून टाकल्यानंतर त्यांच्या चुकीच्या कृतीस पाठिंबा दिल्याचा आरोप असलेले सुनील माने न्यायालयीन कोठडीत असताना त्यांना मंगळवारी (1 जुन 2021 रोजी) पोलिस सेवेतून काढून टाकले. (Antilia bomb scare case: Third police officer arrested in Antilia bomb scare case, immediate removal order issued …)

मुंबई पोलिस आयुक्त हेमंत नागराळे यांनी मुंबई पोलिस दलातील कलम 311 (2) (बी) अन्वये मुंबईत तैनात पीआय सुनील माने यांची तातडीने सेवा संपवण्याचे आदेश जारी केल्याचे मुंबई पोलिसांच्या प्रवक्त्याने सांगितले.

एन्टिलिया प्रकरणात तिसर्‍या पोलिस अधिकार्‍याला अटक…

एन्टीलिया प्रकरणात अटक झालेले पीआर सुनील माने हे तिसरे पोलिस अधिकारी आहेत. यापूर्वी सहाय्यक पोलिस निरीक्षक रियाझुद्दीन काझी यांना अटक करण्यात आली होती. स्फोटक प्रकरणात सचिन वाझे यांना पाठिंबा दिल्याचा आरोप काझी यांच्यावरही आहे. काझी यांच्याच विधानाच्या आधारे सुनील माने यांना अटक करण्यात आली. (Third police officer arrested in Antilia case …)

यापूर्वी महाराष्ट्र एटीएसने मनसुख हिरेन हत्या प्रकरणात माजी कॉन्स्टेबल विनायक शिंदे आणि क्रिकेट बुकी यांना अटक केली होती. कोर्टाच्या आदेशानंतर त्याला एनआयएच्या ताब्यातही पाठविण्यात आले.

मनसुख हिरेनच्या हत्येमध्ये मानेचा हात असल्याचा संशय आहे..

अटकेपूर्वी सुनील माने कांदिवली गुन्हे शाखेत तैनात होते. स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांची पत्नी विमला हिने महाराष्ट्र एटीएसला सांगितले होते की 4 मार्च रोजी रात्री आठ वाजता मनसुख हिरेन घराबाहेर पडल्यावर त्यांनी सांगितले होते की कांदिवली गुन्हे शाखेचे निरीक्षक तावडे त्यांच्याकडे येणार आहेत .परंतु मिळालेल्या माहितीनुसार, विमला यांनी उल्लेख केलेले तावडे हे सुनील मानेच होते. (It is suspected that Sunil Mane was involved in the murder of Mansukh Hiren. )

संपूर्ण प्रकरण काय आहे?

2 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार दक्षिण मुंबईतील पेडर रोडवरील एन्टिलियापासुन 300 मीटर अंतरावर उभी असल्याचे आढळले. कारमध्ये 20 जिलेटिन काड्या व धमकीचे एक पत्र सापडले. त्यानंतर 5 मार्च रोजी त्या कारचा मालक मनसुख हिरेन याचा मृतदेह रेती बंदरच्या खाडीत सापडला. त्यानंतर महाराष्ट्र एटीएसने (ATS) हत्येचा गुन्हा दाखल करून 2 जणांना अटक केली. यानंतर एनआयएकडे हे प्रकरण संपवल्यानंतर 13 मार्च रोजी सचिन वाझे (Sachin vaze) यांना अटक करण्यात आली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments