खूप काही

Antilia Bomb Scare Case:एन्टिलिया स्फोटक प्रकरणात आणखी दोन पोलिसांना अटक, NIA ची कारवाई

एन्टिलिया स्फोटक प्रकरणाची तपासणी सुरू असताना संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना अटक करण्यात आली आहे.

Antilia bomb scare case :देशातील मोठे उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या एन्टिलिया (Antilia) या निवासस्थाबाहेर फेब्रुवारी महिन्यात एसयूव्ही गाडीमध्ये स्फोटक सामग्री सापडल्याची चौकशी करणार्‍या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (NIA-National investigation agency) आणखी दोन लोकांना अटक केली आहे. सदर प्रकरणाची तपासणी सुरू असताना संतोष शेलार आणि आनंद जाधव यांना 11 जून रोजी मालाड उपनगरातून अटक करण्यात आली आहे.

अंबानींच्या निवासस्थानाजवळील एसयूव्ही चारचाकी गाडीत स्फोटक पदार्थ ठेवण्यात संतोष शेलार आणि आनंद जाधव या दोघांचा हात होता असे समोर आल्याने कोर्टाने या दोघांना 21 जूनपर्यंत एनआयएच्या ताब्यात दिले आहे.

सध्या एनआयए शेलार आणि जाधव यांचा ठाणे येथील व्यावसायिक मनसुख हिरेन याच्या हत्येमध्ये काही हात आहे की नाही याची चौकशी करत आहे. मनसुख हिरेन (Mansukh Hiren) हा एसयूव्हीचा मालक होता जी 25 फेब्रुवारीला अंबानीच्या निवासस्थान ‘अँटिलिया’ च्या बाहेर जप्त केली होती आणि त्यानंतर 5 मार्च रोजी ठाणे किनाऱ्यावर हिरेन यांचा मृतदेह सापडला होता.

सहाय्यक पोलिस निरीक्षक सचिन वाजे (Sachin vaze) हा मुख्य आरोपी असून त्याला आता डिसमिस करण्यात आले आहे. अंबानीच्या सुरक्षा दलाली आणि मनसुख हिरेन हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन अधिकारी, एक कॉन्स्टेबल व एक क्रिकेट बुकमेकर आणि चार पोलिसांना अटक करण्यात आली आहे.तसेच अटक केलेल्या पोलिसांना नोकरीतून काढून टाकण्यात आले आहे.अशी माहिती एनआयएने (NIA) दिली.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments