आपलं शहर

Antilia scare : अँटिलिया स्फोटके प्रकरणात आणखी एका बड्या पोलिसाला केलं बडतर्फ

चार पोलिस अधिकार्‍यांना नोकरीवरून निलंबित केले आहे.

Antilia scare

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार उभी करणे आणि मनसुख हिरेन यांची हत्या घडवून आणल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) अटक केलेल्या पोलीस निरीक्षक सुनील माने (Police Inspector Sunil Mane) यालाही नोकरीवरून निलंबित केले आहे. सुनील माने हा मुंबईतील कांदिवली क्राईम ब्रांच युनिट 11 मध्ये पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता

या प्रकरणात आत्तापर्यंत एनआयएने वाझेसह पोलीस रियाझुद्दीन काझी आणि सुनील माने या अधिकाऱ्यांसह पोलीस हवलदार विनायक शिंदे याला अटक केली आहे. या चार पोलिस अधिकार्‍यांना नोकरीवरून निलंबित केले आहे. सुनील मानेला 23 एप्रिलला एनआयएने अटक केली.

मंगळवारी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी भारतीय संविधानाच्या घटना कलम 311 (२) (ब) अंतर्गत विशेषाधिकाराचा वापर करून सुनील माने याला नोकरीवरून काढून टाकण्याचे आदेश दिले.

अंबानींच्या घराजवळील कारमध्ये 25 फेब्रुवारीला जिलेटिनच्या काड्या सापडल्या होत्या, त्यावर मनसुख हिरेन यांची ती गाडी होती आणि काही दिवसांपूर्वी गाडी चोरीला गेली होती, याची महिती दिली होती, अखेर मनसुख हिरेन यांची हत्या झाल्याचे उगगड झाले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments