Best photoshoot location : मुंबईत फोटोशूट करताय? ही ठिकाणे आहे बेस्ट डेस्टिनेशन
फोटोशुटसाठी मुंबईतील 10 उत्तम ठिकाणांची माहिती पाहुया...

Best photoshoot location: मुंबई ही भारताची आर्थिक राजधानी आणि सर्वोत्तम पर्यटन शहर आहे. याचबरोबर मुंबईला अनेक अतिशय सुंदर कलात्मक ठिकाणांची देणगी देखील लाभली आहे. या ठिकाणी अनेक पर्यटक आणि मुंबईकर फोटोशूटसाठी आवर्जून भेट देतात. तर अशाच दहा सुंदर ठिकाणांची माहिती आपण जाणून घेऊया…(Best photoshoot location: Do photoshoot in Mumbai? This place is the best destination)
1. गेट वे ऑफ इंडिया

फोटोशूट आणि पर्यटनाचे केंद्र असलेले गेट वे ऑफ इंडिया जगातील प्रतिष्ठित ठिकाणांपैकी एक आहे.या प्रतिष्ठित ठिकाणाहून सुवर्ण किरण दिसू लागतात तेव्हा त्याची भव्यता जगात उत्तम मानली जाते. त्यामुळे अनेक लोक फोटोशूटसाठी गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणाची आवर्जून निवड करतात.(Gate way of India)
2. मरीन ड्राइव्ह

मरीन ड्राईव्ह हे ठिकाण नेहमीच लोकांना फोटोशूटसाठी आकर्षित करते विशेषतः सूर्यास्ताच्या वेळी येथील सुंदर दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात.अनेक लोकांचे आकर्षण असलेल्या मरीन ड्राईव्ह येथील लांब रस्त्याला क्वीन्स नेकलेस असे म्हणतात कारण सूर्यास्ताच्या वेळी हा रस्ता सूर्यकिरणांमुळे चमकलेला दिसून येतो.(Marine drive)
3. काला घोडा

काला घोडा हे मुंबईतील उत्कृष्ट वास्तुकला, हेरिटेज साइट आणि आर्ट गॅलरी असलेले ऐतिहासिक ठिकाण आहे. या ठिकाणाचे नाव काळ्या घोड्याच्या मूर्तीवरून घेतलेले आहे. काळा घोडा येथील बहुरंगी भित्तीचित्रे असलेल्या भिंती समोर आतापर्यंत सर्वात जास्त फोटोज क्लिक केले गेले आहेत. (Kala ghoda roads)
4. एशियन लायब्ररी

एशियन लायब्ररी हे स्थान बर्याच चित्रपटांमध्ये दिसले आहे.येथील शुभ्र गोलाकार खांब आणि पायऱ्या अनेक पर्यटकांना फोटोशूटसाठी आकर्षित करतात.(Asian library)
5. सीएसएमटी टर्मिनस

फोटोशूटसाठी छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस या स्थानकाची इमारत अत्यंत सुंदर स्थान आहे. जागतिक वारसा असलेली ही सुंदर इमारत आर्किटेक्चरल सौंदर्याचे उत्तम उदाहरण आहे.(CSMT Terminus)
6. कुलाबा मार्केट

या रस्त्यावर नेहमीच पर्यटक आणि स्थानिकांची गर्दी असते. इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडियासाठी सुंदर सुंदर फोटो क्लिक करण्यासाठी हे एक प्रसिद्ध स्थान आहे. (colaba market)
7. बाणगंगा

बाणगंगा ही एक थंड जागा आहे प्राचीन पवित्र पाण्याच्या टाक्यांपैकी एक असलेली बाणगंगा, येथील दृश्य खूप सुंदर आहेत.त्यामुळे येथे आपण अतिशय सुंदर सुंदर फोटो क्लिक करू शकतो. (Banganga tank)
8. धोबी घाट

जगातील आऊटडोअर शूटच्या ठिकाणांपैकी असलेले एक ठिकाण म्हणजेच धोबीघाट ज्याला काही चित्रपटांमध्ये वैशिष्ट्यीकृत केले गेले आहे, ते फोटो शूट करण्यासाठी सर्वात चांगले ठिकाण आहे.(Dhobi ghat mumbai)
9. वांद्रे वरळी सी लिंक

वांद्रे सी लिंक अनेक तरुण-तरुणींचे फोटोशूटसाठी आवडते ठिकाण आहे. वांद्रे किल्ल्यावरी नेत्रदीपक दृश्यआणि येथील सुंदर वास्तु हे फोटोशूटसाठी एक उत्तम स्थान बनले आहे. (Bandra sea link)
10. एलिफंटा लेणी

एलिफंटा हे बेट आपल्याला काही विलोभनीय फोटो क्लिक करण्यासाठी उत्तम संधी देते. एलिफंटा येथील काही प्राचीन लेण्या आणि इतर काही ठिकाणे फोटो शुटसाठीचा चांगला पर्याय आहे. (elephanta caves)