Black Fungus : काळ्या बुरशीच्या इंजेक्शनचे ब्लॅक मार्केटिंग करणाऱ्या तिघांना अटक
Black Fungus : कपूरवाडी पोलिसांनी लिपोसोमल अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचे ब्लॅक मार्केटींग करणाऱ्या तीन लोकांना अटक केली आहे.

Black Fungus : कपूरवाडी पोलिसांनी लिपोसोमल अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचे ब्लॅक मार्केटींग करणाऱ्या तीन लोकांना अटक केली आहे. अॅम्फोटेरिसिन बी इंजेक्शनचे ब्लॅक मार्केटींग होत असलेली माहिती माहिती मिळताच पोलिसांनी शुक्रवारी कापूरबावडी जंक्शनजवळ सापळा रचला. सुरुवातीला दोन जणांना पकडले. “आरोपींनी ही औषधे सुमारे 7400 रुपयांमध्ये विकत घेतली आणि ती सुमारे 10,500 रुपयांना विकली. त्यांच्याकडून 14 इंजेक्शन्स जप्त केली आहेत, ‘अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपींनी ही इंजेक्शन कुठून घेतले आणि या रॅकेटचे इतर दुवे शोधून काढत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकारी अनिल देशमुख यांनी दिली, पोलिसांनी तिसर्या आरोपीलाही अटक केली आहे. अटक केलेला एक आरोपी बीएमसीकडे मार्शल म्हणून काम करत होता तर अन्य दोघे फार्मास्युटिकल कंपनीत काम करत असल्याची माहितीही पोलिसांनी दिली.