आपलं शहर

BMC Election 2022: पालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, झोपडपट्टीधारकांसाठी शिवसेनेचा प्रस्ताव

महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी शिवसेनेचा नवीन प्रस्ताव, 2011 पर्यंतच्या सर्व झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठयाची मागणी.

BMC Election 2022: 2022 मध्ये मुंबई पालिकेच्या निवडणुका घेण्याचा आदेश राज्य निवडणुका आयोगाने (State Election Commission) पालिकेला दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेनेने आतापासूनच निवडणुकीची तयारी करायला सुरुवात केली आहे.(Mumbai Municipal Corporation elections will be held in 2022)

शिवसेनेचा नवीन प्रस्ताव
मतदार संख्या वाढवण्यासाठी शिवसेनेने 2011 साल पर्यंतच्या सर्व झोपडपट्ट्यांना पाणीपुरवठ्याचा नवीन प्रस्ताव मांडला आहे. ज्यावर शुक्रवारी बीएमसीमध्ये चर्चा केली जाणार आहे, त्याचबरोबर नगरपालिका आणि राज्यामध्ये शिवसेनेची सत्ता असल्या कारणाने हा प्रस्ताव मंजूर केला जाऊ शकतो.(2022 assembly election india. Shiv Sena’s new proposal)

विनोद घोसाळकर यांनी पाठवले किशोरी पेडणेकर यांना पत्र
महानगरपालिका नियमानुसार 1995 पासून ज्या झोपडपट्टीला अधिकृत असा दर्जा मिळाला आहे, फक्त त्याच झोपडपट्टीला बीएमसीकडून पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता, त्यानंतर तो नियम 2000 पर्यंतच्या झोपडपट्टीला लागू करण्यात आला होता. शिवसेने आता तोच नियम 2011 साल पर्यंत निर्माण झालेल्या झोपडपट्टीसाठी लागू करण्याचा प्रस्ताव केला आहे. 2011 पर्यंतच्या सर्व झोपडपट्ट्यांना पाणी देण्याची मागणी शिवसेनेकडून होत आहे. यासंदर्भात शिवसेनेचे माजी आमदार विनोद घोसाळकर यांनी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांना पत्र पाठवले आहे.(Letter sent by Vinod Ghosalkar to Kishori Pednekar)

किशोरी पेडणेकरांनी दिली माहिती
दहिसरमधील गणपत पाटील नगरमध्ये बीएमसीने 2000 पर्यंतच्या झोपडपट्टीला पाणीपुरवठा केला आहे. तसाच 2021 पर्यंतच्या झोपडपट्ट्यांना देखील पाणी पुरवठा केला जावा या संदर्भात महापालिकेत चर्चा सुरू आहे. याबाबतची सर्व माहिती महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar) यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.(Information given by Kishori Pednekar)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments