आपलं शहर

BMC Election : निवडणुकांआधीच मुंबईत प्रचारांना सुरुवात, बॅनरबाजीमुळे शिवसेना गोत्यात

सध्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा डंका वाजण्यास सुरुवात झाली आहे. अनेक ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारासाठी सुरुवात झाली आहे.

BMC Election : मुंबईत अनेक ठिकाणी लसींचा तुटवडा जाणवत असतानादेखील अनेक लसीकरण केंद्रांचे उद्घाटन सोहळे, फलकबाजी, श्रेय घेण्यासाठी नेत्यांची धडपड सुरू आहे. पालिकेच्या खर्चाने लसीकरण होत असताना लोकप्रतिनिधींकडून अशी जाहिरातबाजी होऊ लागल्याबद्दल महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल (Commissioner Iqbal Singh Chahal) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर लसीकरण केंद्राच्या बाहेर जाहिरात बाजी दिसल्यास कारवाई करण्यात येईल असे देखील आदेश देण्यात आले आहेत. (Campaigning started in Mumbai even before the elections)

मुंबईत 16 जानेवारीपासून लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. दिवसेंदिवस लसीकरण केंद्रांची संख्या वाढवण्यात आली, मात्र अनेक केंद्रांवर लसींचा तुटवडा कायमस्वरूपी जाणवत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. सरसकट मुंबईकरांचे लसीकरण व्हावे, यासाठी आयुक्तांनी महानगपालिकेच्या 227 वार्डमध्ये लसीकरण केंद्र उभारण्याच्या सुचना नगरसेवकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

नगरसेवकांनी लसीकरण केंद्रांची उभारणी केली, मात्र लसींपेक्षा अशा ठिकाणी नगरसेवकांकडून बॅनरबाजी दिसून आली, एकीकडे फेब्रुवारी2022 मध्ये पालिकेच्या निवडणुका होणार असून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम त्यातील प्रचाराचा भाग होऊ लागल्याचं चर्चांना उधाण आलं आहे. लसीरकरण केंद्रावर जाहिरात बाजी करण्यात येत असल्याने यावर आयुक्तांनी आक्षेप घेऊन परिपत्रक काढून नाराजी दर्शवली. (BMC Election 2022)

बॅनरबाजी करण्यात नंबर एकला शिवसेना पक्ष आहे, असा आरोप मनसेकडून केला जात होता. यापुढे बॅनरबाजी केल्यास कारवाई केली जाईल, अशी माहिती पालिकेकडून देण्यात आल्या आहेत.

लोकप्रतिनिधींकडून करण्यात येणाऱ्या जाहिरातबाजीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे येत आहेत. त्यामुळे पालिका आयुक्तांनी जाहिरातबाजी रोखण्याची तंबी दिली आहे. अशा प्रकारच्या अनुचित जाहिराती करणे हे योग्य नाही, अशा शब्दांत त्यांनी लोकप्रतिनिधींच्या या वर्तनाचा समाचार घेतला आहे. एखाद्या विभागात एखादा लोकप्रतिनिधी अशी जाहिरात करत असल्यास त्यांनी जाहिरात करू नये, असे आवाहन करण्याचे आदेश आयुक्तांनी सर्व अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांना दिले आहेत.

लोकप्रतिनिधींशी संवाद साधून या जाहिराती काढून टाकण्याबाबत विनंती करावी, असेही सांगण्यात आले आहे. बॅनरबाजी होत असताना अनेक वेळा मनसेने संबंधित आयुक्तांना पत्र लिहून बाब निदर्शनास आणली होती, पण याकडे दुर्लक्ष केले जात होते. त्यामुळे आयुक्तांनी जाहीरातबाजीवरून काढलेल्या परिपत्रक म्हणजे उशिरा सुचलेल शहानपण आहे अशी टीका मनसेकडून करन्यात आली आहे. (Campaigning started in Mumbai even before the elections)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments