आपलं शहर

BMC update: मुंबईत कोरोनाच्या नियमात शिथीलता, BMCचे मार्शल गेले कुठे?

मुंबईमध्ये कोरोनाच्या मार्गदर्शक नियमांमध्ये शिथिलता केल्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळत आहे

BMC Update :आरोग्य विभागाकडून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची (corona second wave) शक्यता वर्तवण्यात आल्यानंतर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून (BMC) क्लीन-अप मार्शलची (clean up marshal) संख्यादेखील वाढवण्यात आली होती. मुंबईमध्ये कोरोनाच्या मार्गदर्शक नियमांमध्ये शिथिलता केल्यामुळे अनेक ठिकाणी गर्दी होताना पाहायला मिळत आहे.(In Mumbai, corona guidelines have been relaxed, leading to congestion in many places)

गर्दीच्या ठिकाणी अनेक नागरिक विनामास्क असतानाचे चित्र सध्या मुंबईमध्ये दिसत आहेत,त्यामुळे ज्या मार्शल यांची नेमणूक पालिकेकडून करण्यात आली होती.ते मार्शल कुठे आहेत असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. (BMC update: Relaxation in corona rule in Mumbai, where did BMC’s marshal go?)

संपूर्ण देशात कोरोनाची सुरुवात झाली तेव्हापासून मास्क वापरणे सक्तीचे करण्यात आले होते. मार्च 2020 ते आत्तापर्यंत मास्क आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक झालेला आहे, जेव्हा कोरोनाला सुरुवात झाली तेव्हा अनेक नागरिक मास्क वापरत नसल्याने महानगरपालिकेने कंत्राट पद्धतीने क्लीन-अप मार्शल ची नियुक्त केली होती.

सार्वजनिक ठिकाणी जे नागरिक वीनामास्कचे फिरतील त्यांच्यावर मार्शल दोनशे रुपये दंड घेत होते. त्यातून मुंबई पोलीस (Mumbai police) आणि आणि रेल्वे प्रशासनाने (ministry of railway) आतापर्यंत 55 कोटी रुपयांहुन अधिक दंड विना मास्क फिरणाऱ्याकडून वसूल करण्यात आलेला आहे.

मुंबईत मार्शल दिसेनासे झालेत…

संपूर्ण राज्यात आणि मुंबईत कोरोनाच्या नियमांमध्ये शिथिलता दिल्याने अनेक नागरिक गर्दी करताना पाहायला मिळत आहेत, परंतु पहिल्या आणि दुसर्‍या लाटेच्या वेळी जे क्लीन-अप मार्शल चौपाट्यांवर ,मार्केटमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी पाहायला मिळत होते ते मात्र मार्शल आता दिसेनासे झाले आहेत. ज्या दादरमध्ये मार्शल यांच्या तीन ते चार टीम तैनात करण्यात येत होत्या त्याच दादरमध्ये (Dadar) एकही मार्शल उपस्थित नाही.(BMC Marshal disappears in Mumbai …)

मुंबई शहर आणि उपनगरा भागामध्ये एकूण 24 वार्डमध्ये मार्शल नेमण्यात आले होते.हे मार्शल कंत्राटी पद्धतीने कामावर रुजू करण्यात आले होते,परंतू आता मुंबईमध्ये शिथीलता करण्यात आली असून यामध्ये अनेक नागरिक विना मास्कचे फिरत आहेत.

नागरिकांच्या बेजबाबदारपणाबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या,कोरोनाशी आपल्याला लढायचं असून कोरोना गेला असा लोकांनी समज करू नये. पालिकेने कारवाईसाठी माणसे नेमण्यापेक्षा लोकांनी स्वतःची काळजी घ्यावी.तर कोरोनाची तिसरी लाट देखील येण्याची शक्यता वर्तवली असताना, मार्शल नसतील तर प्रशासनाने यावर लक्ष द्यावे अशी प्रतिक्रिया भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी दिली.

लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी…

एकीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे त्यादृष्टीने पालिका तयारी देखील करत आहे. या लाटेचा धोखा लहान मुलांना असणार आहे असं देखील सांगण्यात आलेलं असताना अनेक लहान मूल देखील विनामास्क रस्त्यावर फिरत आहेत त्यामुळे लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी. (Take special care of children …)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments