आपलं शहर

BMC Vaccine Shortage : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना BMC ने फसवलं? वाचा नेमकं काय झालं!

विद्यार्थ्यांनी बीएमसीच्या वॉक-इन लसीकरणाबद्दल केली तक्रार..

BMC Vaccine Shortage: परदेशी शिक्षणासाठी जाणाऱ्या अनेक इच्छुक विद्यार्थ्यांना मुंबईमधील सरकारी राजवाडी हॉस्पिटलमध्ये सलग दुसऱ्या दिवशी देखील कोरोनाची लस मिळाली नाही.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने(BMC) मागच्या आठवड्यात अशा विद्यार्थ्यांसाठी राजवाडी हॉस्पिटल, कस्तुरबा हॉस्पिटल आणि कूपर हॉस्पिटल येथे नोंदणी न करता सोमवार ते बुधवार दरम्यान लसी देण्यात येणार अशी घोषणा केली होती. महानगरपालिकेने यासाठी मंगळवारी 500 लसींचे वाटप केले होते. कस्तुरबा आणि कूपर रूग्णालयाला 200-200 लसींचे वाटप केले गेले होते.(100 shots, 400 in line: students complain about BMC’s walk-in vaccination facility)

फक्त 100 लसी देण्यात आल्या तर 400 पेक्षा अधिक लोक रांगेत
घाटकोपरमधील राजवाडी हॉस्पिटलमध्ये सकाळीच विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. संदेश अहवद या विद्यार्थ्याने महानगरपालिका आणि महाराष्ट्र पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांना ट्विट केले होते की, ‘आम्ही घाटकोपरच्या राजवाडी रुग्‍णालयात लसीकरणासाठी रांगेत आहोत. इथे आतापर्यंत 100 लसी देण्यात आल्या आहेत आणि 400 पेक्षा जास्त लोक अजूनही रांगेत आहेत. त्यामुळे आम्हाला लस मिळणार की नाही हे सुनिश्चित करा’.(Only 100 vaccines were given and more than 400 people lined up)

विद्यार्थी सात वाजल्यापासून रांगेत
राहुल नावाच्या दुसऱ्या विद्यार्थ्याने सांगितले की, तो सकाळी सात वाजल्यापासून रांगेत उभा आहे. परंतु इतर लोक त्याच्या आधीपासूनच रांगेत उभे आहेत. बीएमसी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कस्तुरबा रुग्णालयात 338, कूपर रुग्णालयात 324 आणि राजवाडी रुग्णालयात 325 लसींचा पुरवठा करण्यात आला आहे.(Students have been queuing since seven o’clock)

दोन वेळा लस न देता घरी पाठवण्यात आले.
शाह यांनी असे ट्विट केले आहे की, ‘मी काल राजावाडी रुग्णालयात गेलो होतो. मोठी रांग होती म्हणून पोलिसांना काय करावे ते विचारले. ते म्हणाले, उद्या या. म्हणून मी घरी परतलो. मी आजही गेलो होतो , आज फक्त 100 डोस असल्याने पुन्हा घरी जायला सांगितले’.(Twice sent home without vaccination)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments