फेमस

Bollywood Actors :अक्षय कुमारचा नवा चित्रपट लवकरच, केला बहिणीला समर्पित

अभिनेता अक्षय कुमार यांचा "रक्षाबंधन" चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे

Bollywood Actors :कोरोनाची दुसरी लाट कमी झाल्याने बॉलिवूडचे शूटिंग बऱ्याच काळानंतर सुरू झाले आहे. अभिनेता अक्षय कुमार यांचा “रक्षाबंधन” ( rakshabandhan ) चित्रपटाचे शूटिंग सुरू होत आहे. शूटिंगचा आजचा पहिला दिवस होता.

अभिनेता अक्षय कुमारने आनंद एल राय यांच्यासोबत एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही पोस्ट आपली बहिण अलका हिरानंदानीसाठी आहे, ( alka hiranandani) असे सांगितले आहे. फोटोमध्ये अक्षय कुमार रंगाचा कुर्तामध्ये दिसत आहे.

कपाळावरील टिका आणि बारिक मिश्या असा देशी लुक देत आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शकही त्याच्यासोबत बसले आहेत. अभिनेत्याने फोटो कॅप्शनमध्ये लिहिले की ‘मोठी असताना माझी बहीण अलका माझी पहिली मैत्रीण होती. आनंद एल राय यांचे रक्षाबंधन हे त्यांना समर्पण आणि त्या विशेष बंधाचा उत्सव आहे. आज शूटिंगचा पहिला दिवस आहे, आपले प्रेम आणि शुभेच्छा आवश्यक असल्याचं अक्षय म्हणतो.

अक्षय कुमार यांच्या रक्षाबंधन चित्रपटात बहिणीची भूमिका अभिनेते सदिया खातीब, सहजमीन कोर, दीपिका खांन्ना आणि स्मृती श्रीकांत हे चार नवीन चेहरे दिसणार आहे. या चित्रपटाचे लेखक आणि लेखिका हे एक जोडपे असून हिमांशू शर्मा आणि दिलं यांनी केले आहे.

या चित्रपटात भूमी पेडणेकर ( bhumi pednekar) देखील आहे, पहिला चित्रपट टॉयलेटमध्ये ही अक्षय कुमार आणि भूमी एकत्र दिसले होते, आता दुसऱ्यांदा रक्षाबंधन चित्रपट ऑन स्क्रीन स्पेस शेअर करताना दिसणार आहेत.
गेल्या वर्षी रक्षाबंधनच्या निमित्ताने जाहीर केलेला हा चित्रपट आता प्रत्यक्षात उतरत आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments