फेमस

Bollywood actors: गावी जाऊन मनोज बाजपेयींची धम्माल मजा, मुंबईहून बिहारला रवाना

अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते भर पावसात आले होते.

Bollywood actors: राधाकांता वाजपेयी यांची तब्येत अचानक खराब झाल्याने अभिनेता मनोज बाजपेयी आपल्या मूळ गावी पोहोचले आहेत. हे कळताच गावात लोकांची गर्दी जमायला सुरुवात झाली आहे. अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी त्यांचे चाहते भर पावसात आले होते.

“मी फॅमिली मॅन-2 च्या प्रमोशनमध्ये व्यवस्थ होतो. अचानक वडिलांची तब्येत खराब असल्याची माहिती कळताच मी बिहारमध्ये आलोय. लवकरच मुंबईला जाण्याची शक्यता आहे. शूटिंग चालूच असते, परंतु वडिलांबरोबर वेळ घालवणे खूप महत्त्वाचे आहे. असं मत मनोज यांनी पत्रकारांशी बोलताना मांडलं आहे.
चित्रपट तर होतच राहतील, पण वडिलांसोबत वेळ घालवणे ही सर्वात मोठी संपत्ती आहे. माझ्याबरोबर पत्नी अभिनेत्री शबाना रजा बाजपेयी आहे. वडिलांची तब्येत बिघडल्याने आम्ही गावी आलो होतो,मात्र आता त्यांची तब्येत बरी आहे. आम्ही गावी उसाच्या शेतात फिरणे, आंब्याच्या बागांमध्ये फिरत होतो. नदीच्या काठी मजा केली. मित्र परिवाराला भेट दिली. गवामध्ये फेरफटका मारत असताना गावातील लोकांनी त्यांच्या भोवती गर्दी जमा केली होती. असं मतही मनोज यांनी व्यक्त केले.

गँग ऑफ वासेपुर फेम मनोज बाजपेयी यांना पाहून ग्रामस्थांना आनंद झाला होताच, अत्यंत गरीब परिस्थितीतून अभिनयाच्या जगात स्थान मिळवणाऱ्या अभिनेता मनोज बाजपेयीला पाहून गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments