फेमस

Bollywood Actress : मुलाचा बर्थ डे सोडून सगळ्यांच्या नजरा मलायकाच्या हॉट लूकवर

एकापेक्षा एक सुंदर आणि आकर्षक कपड्यांचे कलेक्शन तीच्याकडे आहे.

Bollywood Actress :फॅशन आणि फिटनेससाठी बॉलीवूडमध्ये प्रसिद्ध असलेली अभिनेत्री मलायका अरोर रोजच्या लाइफस्टाइलमुळेही प्रसिद्ध आहे. स्टायलिश कपडे घालणे असो; किंवा कार्यक्रमानुसार आउटफिटची निवड करणे, याचे उत्तम नॉलेज मलायकाला आहे. एकापेक्षा एक सुंदर आणि आकर्षक कपड्यांचे कलेक्शन तीच्याकडे आहे.

मलायका कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करून तिच्या सौंदर्याची झलक चाहत्यांना देत असते. चाहतेही तिच्या फोटोंना भरभरून कमेंट्स आणि लाईक करतात.

मुलगा अरहान खानच्या  (arhan khan) वाढदिवशीही मलायकाने परिधान केलेला बोल्ड लूक सगळ्यांच्या नजरेला पडला आहे. अरहान खानचा 17 व्या वाढदिवसानिमित्त खास पार्टी आयोजित केली होती, या पार्टीपार्टीमध्ये अरबाज खानसह अमृता अरोरा, सीमा खान, शनाया कपूर आणि अनन्या पांडे यांसारख्या सेलिब्रिटींनी उपस्थिती लावली होती (bollywood actors) . पार्टीसाठी ग्लॅमरस, सेक्सी लूकच्या ड्रेसची निवड केली होती.

काळ्या रंगाचा ब्लेझर ड्रेस, लेदर फॅब्रिकपासून तयार केला होता. हे आउटफिट बॉडीकॉन फिटिंग पॅटर्नमधील होतं. ड्रेसचे हेमलाइन फ्री फ्यूज लूकमध्ये ठेवण्यात आलं होतं. शानदार फिटिंग असणाऱ्या या ए-लाइन ड्रेसमध्ये प्लंजिंग नेकलाइन डिझाइनही उठून दिसत होती.

यामध्ये सोनेरी रंगाच्या बटण डिझाइनचे डिटेलिंग जोडण्यात आले होते. गडद रंगाचा बेल्ट ठळकपणे दिसावा यासाठी त्यावर सोनेरी रंगाचा वापर केला गेला. तिच्या ड्रेस बेल्टची किंमत जवळपास ५० हजार रूपये आणि ड्रेसची किंमत जवळपास ५६ हजार रूपये आहे. हटके लूक मिळावा यासाठी प्रसिद्ध अमेरिकन फॅशन डिझाइनर अलेक्झेंडर वँगच्या कलेक्शनमधील फ्लॅट बेल्टचा वापर या ड्रेसिंगमध्ये केला आहे.

मलायका नेहमीच साध्या लूकला बोल्ड लूक कसा द्यायचास यावर विचार करत असते. कॅज्यूअल लूकमध्येही ती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. सकाळी जिमला जातानाचे आऊटफिट असो किंवा पार्टीवेअर ड्रेस असो.

या दरम्यान या शॉर्ट ड्रेसला आकर्षक करण्यासाठी मलायकाने ‘Gianvito Rossi’चे डिझाइनर काळ्या रंगाचे उंच टाचांचे फुटवेअर तर हातामध्ये ‘Emilio Pucci’ ब्रँडचे डिझाइनर चमचमणारे क्लचचा देखील समावेश आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments