फेमस

Bollywood actress: अभिनेत्रीच्या ड्र्ग्स पार्टीत मुंबई पोलिसांची एन्टी, ऑन दी स्पॉट केली अटक

पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धाड घातली.

Bollywood actress: अभिनेत्रीच्या ड्र्ग्स पार्टीत मुंबई पोलिसांची एन्टी, ऑन दी स्पॉट केली अटक एका बॉलिवूड अभिनेत्रीला आपल्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या पार्टीत ड्रग्जचा वापर करणे महागात पडले आहे.

मुंबईतील सांताक्रुझमध्ये फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ड्रग्ज पार्टी सुरु असल्याची खबर मुंबई पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास धाड घातली.

सांताक्रुज पोलीस स्थानकातील वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर गनोरे यांना गुप्त सुत्रांकडून माहिती मिळाली की, बॉलिवूड अभिनेत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी करतेय आणि ड्रग्जचासुद्धा त्यामध्ये वापर केला जात आहे. तर अभिनेत्री हॉटेलच्या एका रुममध्ये चरसचा वापर करत होती. त्याचवेळी तिच्यासह तिचा मित्र आशिकदेखील होता, त्याला अटक करण्यात आली आहे.

सोमवारी या दोघांना सांताक्रुज पोलिसांनी कोर्टात हजर केले होते. कोर्टाने या दोघांना जमिनावर सोडले आहे. पोलिसांकडून अधिक तपास केला जात आहे. या अभिनेत्रींने तेलगु चित्रपटांमध्येसुद्धा काम केले आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूड आणि ड्रग्स यातील संबंध अनेकदा उघड झाले आहेत. बॉलिवूड कलाकारांचे ड्रग्स कनेक्शन गेल्या काळापासून समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतून एनसीबीने शादाब बटाटा या ड्रग्ज पेडलरला अटक केली होती. बॉलिवुडमधल्या अनेक सेलिब्रिटींना तो ड्रग्ज पुरवत असल्याचं समोर आलं होतं.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments