फेमस

bollywood Actres :गरजुंच्या मदतीसाठी सनी लिओनी धावली, काम पाहून तुम्हीही कौतुक कराल..

संस्थेनेही भारतातील गरजूंची भूक भागवली आहे, त्यात सनी लिओनीच्या विशेष मदतीची चर्चा होत आहे.

bollywood Actres :कोरोना काळात अनेक सेलिब्रिटींनी विविध पद्धतीने गरजुंना मदत केली आहे. शिल्पा शेट्टी, सोनू सूद, राघव जुयाल, मलाइका अरोरा, अक्षय कुमार, सलमान खान इत्यादींनी मदत केली आहे. मिलियन डॉलर व्हेगन’ संस्थेनेही भारतातील गरजूंची भूक भागवली आहे, त्यात सनी लिओनीच्या विशेष मदतीची चर्चा होत आहे.

गरजूंसाठी रस्तावर अन्नदान करताना सनी लियोन आणि तिच्या पतीने पुढाकार घेतला आहे. नुकतेच मुंबईतील गरजूंना जेवण वाटप करताना सनी दिसली आहे.

काय म्हणाली सनी :

कोरोनाच्या कठीण परिस्थितीत अनेकांसमोर मोठी चिंता आहे, ती म्हणजे, मी माझ्या कुटुंबाला किंवा मुलांना खायला कसं देणार? त्यामुळे अगदी मनापासून मी हे काम करतेय.’
सनी लियोनी अन्नदान करताना तिचे व्हिडीओ खूप व्हायरल झाले आहेत, चाहत्यांनी तिचं भरभरून कौतुक केले आहे.
येत्या आठवड्यांत, स्वयंसेवी संस्था वैद्यकीय कामगार, स्थलांतरित कामगार, निवारा, झोपडपट्टी-रहिवासी कुटुंब आणि इतर वंचितांना अग्रभागी ठेवत भारतातील नऊ शहरांमध्ये 100,000 जणांना जेवण देण्यात येईल, अशी माहितीही सनीने दिली आहे.

अभिनयासोबतच ती वेळोवेळी विविध माध्यमातून समाजकार्य करत असते. सोशल मीडियावर सनी लियोनी नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असते. वेगवेगळ्या प्रोजेक्टची माहिती असो, वा कुटुंबातील काही खास क्षण असो, अनेक कार्यक्रमात सनी तिची मुलगी निशासोबत पहायला मिळते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments