फेमस

Bollywood Actroes :सैफ अली खान चौथ्यांदा बाबा झाल्यावर सारा म्हणतेय…

सारा आणि सैफ यांच्यामध्ये चांगले बाँडिंग असल्याचे पाहायला मिळते.

Bollywood Actroes :साराला एका मुलाखतीमध्ये सैफ अली खान चौथ्यांदा बाबा झाल्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने एक खास उत्तर दिलं आहे.

बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेत्रीं सारा अली खान आहे. सारा ही अभिनेता सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी आहे (saif ali khan and amrita singh). सारा आणि सैफ यांच्यामध्ये चांगले बाँडिंग असल्याचे पाहायला मिळते.

बऱ्याच वेळा चित्रीकरणातून वेळ काढून सारा सैफला भेटायला जाते. फेब्रुवारी महिन्यात सैफची दुसरी पत्नी करीना कपूर खानने दुसऱ्यांदा आई झाली (kareena kapoor 2 Time mother). सारादेखील शुभेच्छा देण्यासाठी सैफ आणि करीनाच्या घरी गेली होती. सैफ चौथ्यांदा बाबा झाल्यावर साराला आनंद झाला होता. आता साराने एका मुलाखतीमध्ये छोट्या भावाला पाहून तिची काय प्रतिक्रिया होती हे सांगितले आहे.

ज्यावेळी तिने लहान भावाला पहिल्यांदा भेटली. ‘त्याने माझ्याकडे पाहिले आणि तो हसला. तो एकदम क्यूट आहे’ असे सारा म्हणाली. ‘मी बाबांना चेष्टेत म्हणते की आयुष्यातील प्रत्येक दशकात तुम्हाला मुलं झाली आहेत. विशी, तिशी, चाळिशी आणि पन्नाशीतही. हे बाळ त्यांच्या आयुष्यात आनंद घेऊन आले आहे. त्यामुळे मी खूप खूश आहे.’

सारा लवकरच ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या पूर्वी तिचा “कुली नंबर 1” हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसली होती.अनेक चित्रपटात तीने काम करून आपले नाव कमावले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments