फेमस

Bollywood History: हम दिल दे चुके सनम’ अजय देवगण यांचे म्हणणे:

हम दिल दे चुके सनम या हिंदी चित्रपटाला 22 वर्षे होत आली

Bollywood History :(Hum Din de Chuke Sanam) हम दिल दे चुके सनम या हिंदी चित्रपटाला 22 वर्षे होत आली. चित्रपटाचे 22 वर्ष पूर्ण झाल्यावर अजय देवगणने चित्रपटाशी संबंधित काही जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत. आणि पोस्ट बरोबर एक आश्चर्यकारक टायटलही शेअर केलं आहे.

बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी( sanjay leela bhansali) यांच्या ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटातून सलमान खान, ऐश्वर्या राय आणि अजय देवगन यांनी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाल माजवली होती.

22 वर्षांपूर्वी याच दिवशी अजय देवगणने चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळीसोबत काम केले होते. चित्रपटाच्या विलक्षण कथेने सर्वांना मंत्रमुग्ध केले होते. हा खास क्षण लक्षात ठेवून अजयने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केली आहेत.

पहिल्या फोटोमध्ये तो संजय लीला भन्साळीसोबत दिसला आहे. तर दुसरा फोटोमध्ये चित्रपटामधील एक सीन शेअर केला आहे. त्यात तो सलमान खानसोबत दिसला आहे. त्याचवेळी तिसर्‍या फोटोमध्ये तो चित्रपटाची प्रमुख अभिनेत्री ऐश्वर्या रायसोबत दिसला आहे.

सर्व फोटो एक करून त्यांना ’22 साल हम दिल दे चुके सनम’ चे कॅप्शन लिहिले आहे. सलमान, संजय, ऐश आणि मला माहित होते की आम्ही एक अतिशय संवेदनशील (emotional) चित्रपट बनवत आहोत. पण तो इतिहास घडवेल, असा विचारही त्यावेळी आमच्या मनात आला नव्हता, असं मत त्याने इन्स्टा पोस्टमध्ये मांडलं आहे.

22 वर्षानंतर अजय देवगन पुन्हा एकदा संजय लीला भन्साळीसोबत दिसणार आहे. “गंगूबाई काठियावाडी “चित्रपटात तो पहिल्यांदा आलिया भट्टसोबत दिसणार आहे. सलमान खान आणि ऐश्वर्या राय पहिल्यांदा ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटाच्या वेळी एकत्र दिसले होते.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments