फेमस

bollywood news :कियाराचा किल्लर लूक, बोल्ड अंदाजाने चाहते घायाळ

बच्चन कुटुंबीयांच्या पार्टीसाठी कियाराने बोल्ड डिझाइनर ब्लाउजसह रंगीबेरंगी लेहंगा परिधान केला आहे, यामुळे ती अजूनच मोहक दिसत आहे.

bollywood news :कियारा फॅशन व स्टाइलच्या बाबतीतही मोठ-मोठ्या अभिनेत्रींना टक्कर देताना दिसते. कियाराचे सोशल मीडिया अकाउंट पाहिल्यास ही मॉडेल फॅशनेबल कपड्यांसह आपल्या स्टायलिंगवरही बारीक लक्ष ठेवत असल्याचं दिसून येईल.

विशेष म्हणजे बोल्ड आउटफिट्स ती आत्मविश्वासाने सावरते. पोषाखास ग्लॅमरस लुक कसा द्यायचा आहे, हे या अभिनेत्रीला चांगलंच ठाऊक आहे. तिची फॅशन-स्टाइलमुळे फॉलोवर्सची संख्या जास्त आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)


अमिताभ बच्चन यांनी आयोजित केलेल्या पार्टीमध्ये कियारा अडवाणीने स्टायलिश एन्ट्री केली होती.

अभिनेत्रीनं या पार्टीसाठी केशरी आणि लाल रंगाचे प्रिंट असणारा शिबोरी बोल्ड डिझाइनर ब्लाऊजमुळे आउटफिटला आकर्षक लुक मिळाला आहे. लेहंग्याच्या हेमलाइनवर मायक्रो प्लीट्स डिझाइन देण्यात आली होती.

लेहंग्यावर कियाराने सोनेरी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. डीप नेकलाइन आणि कट-आउट स्लीव्ह्ज डिझाइनमुळे ब्लाउजला हटके लुक मिळालाय.

ब्लाउजवर रेशीम धाग्यांसह मिरर स्टड्स वर्क करण्यात आलं होतं. यामुळे ब्लाउजला शायनी व स्पार्कली लुक मिळला होता. परफेक्ट लुक मिळावा यासाठी अभिनेत्रीनं अनकट डायमंडचे चोकर नेकलेस घातला होता आणि पांढऱ्या रंगाची गोटा लेस पोटली बॅग कॅरी केली होती.

मेकअपसाठी तिनं लाइट टोन फाउंडडेशनसह लाइट बेसिक लायनर, लाइट टोन लिपस्टिक, बीमिंग हायलाइटर अशा ब्युटी प्रोडक्टचा उपयोग केला होता. सेंटर पार्टेड हेअरस्टाइलमुळे अभिनेत्रीचा लुक आकर्षक दिसतोय.

 

View this post on Instagram

 

A post shared by KIARA (@kiaraaliaadvani)

प्रसिद्ध फॅशन डिझाइनर आकांक्षा गजारियाने डिझाइन केलेल्या या ड्रेसमध्ये कियारा प्रचंड क्युट दिसत होती.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments