फेमस

Bollywood updates:ऋतिक रोशन आणि सैफ अली खानच्या विक्रम वेधाचं शूट थांबवलं…

सैफ आणि ऋतिकच्या विक्रम वेधा चित्रपटाच्या शूटिंगला कोरोनामुळे सध्या थांबवण्यात आलं आहे.

Bollywood updates:मुंबईतील फिल्म सिटीमध्ये ऋतिक रोशन आणि सैफ अली खान यांचा विक्रम वेधा (Vikram vedha) या चित्रपटासाठी स्टेज उभारण्यात येत होता. त्याचे संपूर्ण साहित्य देखील पोहचले होते, कारागीरही आले होते, मात्र स्टेज उभारण्याचं काम सध्या थांबवण्यात आलं आहे. (Bollywood updates: Hrithik Roshan and Saif Ali Khan’s Vikram Vedha’s shoot stopped …)

माधवन (Madhavan) आणि विजय सेथूपतीचा (Vijay sathupati) हिट चित्रपट विक्रम वेधाचा हिंदी रिमेकचं (Vikram vedha Hindi remake) काम सुरु आहे. मात्र या चित्रपटावर कोरोनाने (corona pandemic) घाला घातला आहे, त्यामुळे मुंबईमध्ये होणारं या चित्रपटाचं शूट सध्या थांबवण्यात आलं आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएशनमुळे (corona delta variant) याचं शूट परदेशात होणार असल्याची माहिती सिने व्यवस्थापकांनी दिली आहे.

ऋतिक (Hritik Roshan) आणि सैफ (Saif Ali Khan) यांच्या चित्रपटाच्या पहिल्या शेड्युलचे शूटिंग आता परदेशात होणार आहे, सूत्रांच्या मते मुंबईत होणारे सगळे शूट रद्द करण्यात आले आहेत. काही दिवसांपूर्वी हा कॉल घेण्यात आले आहेत. सध्या मुंबईत शुटिंग करणे सोप्पे नाही, त्यात अनेक सहकलाकारांना कोरोनाची लागण झाल्याने हा निर्णय घेतला असल्याचे म्हटले जात आहे. या निर्णयामुळे निर्मात्यांवर मोठा खर्च लादला जाणार असला तरी कलाकारांची सुरक्षितता आणि चित्रपटाचे शुटिंग होणे गरजेचे असल्याचे निर्मात्यांनी म्हटलं आहे.

एफडब्लूईसीआयचे सरचिटणीस अशोक दुबे यांनीदेखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुंबईत होणारे विक्रम वेधाचे शूट सध्या थांबवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

मूळचा तमिळ चित्रपट (Tamil movies) असलेला नियोनायर थ्रिलरला चांगला प्रतिसाद मिळाला होता, त्यामुळे त्याचा हिंदी रिमेक येत आहे. सैफ अली खान हा पोलिसांच्या भूमिकेत दिसणार आहे. तर ऋतिक हा विलनच्या भूमिकेत असेल. पुष्कर गायत्री (Pushkar Gayatri) दिग्दर्शित आणि नीरज पांडे व रिलायन्स इंटरटेनमेंट निर्मित हा चित्रपट विक्रम आणि बेतालच्या कथेला धरून असणार आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments