आपलं शहर

Break the Chain Rules : BMC ची नियमावली जाहीर, दुकाने उघडण्यास परवानगी, मात्र…

लॉकडाऊनमुळे सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला गेला होता. परंतु सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने लोकडाऊन पूर्णपणे शिथील करणे शक्य नसल्याने अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि इतर दुकाने यांच्यासाठी पालिकेने काही नियम जारी केली आहेत.

अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवडाभर चालू राहणार
सध्या महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने बीएमसीने ‘ब्रेक द चैन’ ऑर्डर जारी केले आहे. त्यामुळे मुंबईमधील अत्यावश्यक सेवेतील दुकाने रोज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत चालू राहतील. परंतु शनिवार-रविवार ही दुकाने देखील बंद ठेवण्यात येतील.(Essential service shops will be open from 7 am to 2 pm)

इतर दुकानांसाठी नविन नियम लागू
त्याचबरोबर इतर दुकानांसाठी देखील बीएमसीने नवीन नियम जारी केले आहेत. हॉटेलपासून रस्त्यांवरील छोट्या-मोठ्या दुकानांसाठी नवीन नियम लागू करण्यात येणार आहेत. रस्त्याच्या डाव्या बाजूची दुकाने सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सुरू राहतील. तर रस्त्याच्या उजव्या बाजूची दुकाने मंगळवार आणि गुरुवार या दोन दिवशी सुरू राहतील. शनिवार रविवार ही सर्व दुकाने बंद ठेवण्यात येतील.(New rules apply to other shops)

24 तासात 184 रुग्णांचा मृत्यू
त्याचबरोबर महाराष्ट्रात 24 तासात कोरोना रुग्णांचे 15 हजार 077 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 36 हजार रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत. त्यामुळे कोरोना रिकवरीचा रेट 93.88% वर आला आहे. तर 24 तासांमध्ये 184 रुग्णांचा मृत्यू झाला असल्याने मृत्युदर 1.67 % आला आहे. तर महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे आत्तापर्यंत 3 लाख 95 हजार 370 रुग्ण ठीक होऊन घरी गेले आहेत.(184 patients died in 24 hours)

कोरोना रुग्णांचा राष्ट्रीय रिकवरी रेट 91.6%
3 करोड 50 लाख 55 हजार सॅम्पल पैकी
57 लाख 46 हजार 892 रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्यातले 18 लाख 70 हजार 304 रुग्णांना होम क्वारंटाइन केले आहे. कोरोना रुग्णांचा ठीक होण्याचा राष्ट्रीय दर 91.6% वर आला आहे. तर सध्या देशांमध्ये अजूनही 20 लाखांपेक्षा जास्त कोरणा रुग्णांच्या ॲक्टिव्ह केसेस आहेत.(National recovery rate of corona patients 91.6%)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments