आपलं शहर

CBSC Board exam: केंद्रानंतर महाराष्ट्राचा निर्णय, वाचा 12 वीच्या परीक्षांचे नियोजन काय?

सिबीएससीची 12वीची परीक्षा रद्द केल्या गेल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.

कोरोनामुळे यंदाची सीबीएसईची (CBSE) 12 वीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड(varsha gaikwad) यांनी सांगितले की, आम्ही हाच पर्याय केंद्र सरकारला सुचवला होता. त्यामुळे परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे सरकारच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.

मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदींची मानले आभार
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांचं आरोग्य आणि सुरक्षा आमचं पहिलं प्राधान्य आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द केल्या गेल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(Uddhav thackeray) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे(Narendra Modi) आभार मानले आहेत.(The Chief Minister thanked Narendra Modi)

वर्षा गायकवाड यांनी केले ट्विट
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विटद्वारे सांगितले की, सध्या परिस्थिती पाहता व मुलांवर त्याचा वाढता प्रादुर्भाव आणि परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या मनात वाढलेला तणाव विचारात घेता परीक्षे ऐवजी विद्यार्थ्यांचा विचार करावा. बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीसाठी अतिशय महत्त्वाच्या असतात तरी सध्याची परिस्थिती विचारात घेता मुलांच्या आरोग्याला प्रथम प्राधान्य दिले पाहिजे. विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि सुरक्षा हे लक्षात घेऊन लवकरच बारावीच्या परीक्षेचा निर्णय घेण्यात येईल.(Tweeted by Varsha Gaikwad)

आयसीआयसी(ICIC) बोर्डाने देखील केली परीक्षा रद्द
सीबीएससी(CBSC) बोर्डच्या 12वीच्या परीक्षा मंगळवारी रद्द केल्यानंतर आयसीआयसी बोर्डने देखील बारावीच्या परीक्षा रद्द केल्या. महाराष्ट्रात 12वी बोर्डाच्या परीक्षेबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, महाराष्ट्र शासन ही महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षांबाबत विद्यार्थ्यांचे आरोग्य व हित जोपासून लवकरच निर्णय घेईल.(The ICIC board also canceled the exam)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments