Chanakya Niti : चाणक्य म्हणतात मुलांना वाईट सवयींपासून दूर ठेवायचे असेल, तर हे पहा…
चाणक्यांनी सांगितलेल्या या गोष्टी लक्षात ठेवल्या तर मुले कायम वाईट सवयींपासून दूर राहतात.

Chanakya Niti Marathi : चाणक्यच्या म्हणतात प्रत्येक वेळी चुकीच्या सवयी (bad habits)मुलांमध्ये खूप लवकर प्रवेश करतात.ज्या त्या वेळी याची काळजी घेतली गेली नाही तर पालकांसह मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागतो. मुले ही देशाचे भविष्य आहेत. ज्याप्रकारे, मुले ही पालकांच्या वृद्धावस्थेचे आधार असतात. म्हणूनच, एखाद्या माळी ज्याप्रकारे आपल्या बागेच संरक्षण करतो त्याप्रकारे आपण आपल्या मुलांच्या बाबतीतदेखील लक्ष आणि दक्षता घेतली पाहिजे. माळी नियमितपणे आपली बाग हिरवी आणि सुंदर (beautiful) ठेवण्यासाठी खूप कष्ट करतो. माळी आपल्या बागेकडे जितके जास्त लक्ष देतो तितकीच बाग मोहक आणि सुंदर रहाते. हीच गोष्ट मुलांच्या संगोपनात लागू होते.त्यामुळे पालकांनी मुलांच्या आरोग्याची व त्यांच्या मनामध्ये चाललेल्या प्रत्येक गोष्टीची माहिती घेतली पाहिजे.(Chanakya Niti)
चाणक्यानी त्यांच्या चाणक्य धोरणात मुलांच्या संगोपनाबद्दल खूप अचूक आणि प्रभावी गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य (Chanakya)यांच्या मते, मुले ही कोणत्याही देशाचे किंवा राज्याचे भविष्य असतात. म्हणूनच मुलांचे संगोपन अत्यंत शिस्तबद्ध आणि सुव्यवस्थित पद्धतीने केले पाहिजे. मुलांच्या संगोपनाबद्दल, चाणक्य (Chanakya)म्हणतात की मुलांना जास्त प्रेम दिले जाऊ नये, जास्त प्रिय प्रेमामुळे मुलांमध्ये दोष उद्भवतो. शरीरात साखरेच्या अत्यल्पतेमुळे मधुमेहाचा धोका असतो तशाच प्रकारे मुलेही अधिक प्रेमाने त्यांच्या लक्ष्यापासून विचलित होण्यास सुरवात करतात, प्रेमाने कधीकधी मुले हट्टी होतात. ही परिस्थिती मुलांसाठी चांगली मानली जात नाही.त्यामुळे मुलांवराती जेवढे योग्य आहे तेवढेच प्रेम करा.
चाणक्य (Chanakya)यांच्या मते, मुलांमध्ये चांगल्या मूल्यांची आणि चांगल्या शिक्षणाची इच्छा प्रत्येकवेळी निर्माण केली पाहिजे. कधीकधी काही पालकांना त्यांच्या मुलांची निंदा करण्यास संकोच वाटतो. ज्याप्रमाणे मातीच्या भांड्याला आकार द्यावा लागतो त्याच प्रकारे मुलांच्या प्रत्येक चुकांना टोकायला व ती चूक समजावून सांगायला पालकानी कधीही घाबरू नये. त्यांना काय बरोबर आणि काय चुकीचे यातील फरक समजावून सांगणे फार महत्त्वाचे आहे. जेणेकरून ते पुन्हा चुकीच्या गोष्टी करणार नाहीत.