आपलं शहर

BMC Election 2021 : मुंबईकर शिवसेनेला धडा शिकवणार, पाटलांचं ठासून सांगणं…

अनेक गोष्टींवरून विरोधी पक्षात असलेल्या भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचं नियोजन केलं आहे.

BMC Election 2021 : मुंबईत आधी कोरोना परिस्थिती, त्यानंतर पावसाळ्यातील अनेक जागांचं नुकसान सोबतच अनेक ठिकाणी साचलेलं पाणी, अशा अनेक गोष्टींवरून विरोधी पक्षात असलेल्या भाजपने शिवसेनेला कोंडीत पकडण्याचं नियोजन केलं आहे. त्यात चंद्रकांत पाटील यांनीदेखील शिवसेनेला टोला लगावला आहे. (Chandrakant Patil criticizes Shiv Sena on BMC election 2021 issue)

पहिल्याच पावसात मुंबईची तुंबई झाल्यानंतर अनेक जणांनी बीएमसीच्या कामावर नावे ठेवण्यास सुरुवात केली आहे. त्यात चंद्रकांत पाटलांनीही पूर्ण हिशोब मांडला आहे.

गेल्या 20 वर्षांपासून मुंबई महानगर पालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे, त्यात सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून मुंबई पालिकेची ओळख आहे. 40 हजार कोटींचे बजेट असलेल्या महापालिकेच्या 58 हजार कोटींच्या एफडी आहेत, असं असलं तरी संपूर्ण मुंबईकर धोक्याचं जिवन जगत आहेत. त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत सगळे मुंबईकर शिवसेनेला धडा शिकवणार असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मांडलं आहे.

मुंबई पालिकेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं आहे, त्यामुळे येत्या काळात अनेक पक्ष एकमेकांवर आपलं वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतील, असं चित्र दिसण्याची शक्यता आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments