कारण

CISCE 12th Exam Cancelled : सीबीएसईनंतर सीआयएससीईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा केल्या रद्द…

सीआयएससीईच्या बारावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करून मूल्यांकनमार्फत निकाल जाहीर करण्याचा निर्णय.

CISCE Class 12th Exam 2021 Cancelled : सीबीएसई नंतर सीआयएससीईने (CISCE)12 वीची बोर्ड परीक्षा रद्द केल्या आहेत. बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बारावी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय काल घेण्यात आला आहे. सरकारने सांगितले की सीबीएसईमधील बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार कले जातील. पारदर्शी पर्यायी प्रणालीद्वारे सीबीएसई व सीआयएससीई(CISCE) 12 वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल निश्चित मुदतीत जाहीर केला जाईल. जे विद्यार्थी, या मूल्यांकन निकालावर समाधानी नाहीत त्यांच्यासाठी सीबीएसईकडून कोरोना परिस्थिती सुरळीत झाल्यानंतर याच परीक्षेस उपस्थित राहण्याची संधी विद्यार्थ्यांना दिली जाईल.(CISCE  12th Exam 2021Cancelled)

16 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा :
केंद्र सरकारने बारावीच्या परीक्षा रद्द केल्यानंतर थेट 12 लाख सीबीएसई आणि 4 लाख सीआयएससीई विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर दुसरीकडे, इतर राज्यातील बोर्डदेखील या निर्णयाचे अनुसरण करून परीक्षा रद्द करू शकतात. तरी, हा निर्णय स्वीकारणे त्या त्या प्रत्येक राज्यांना आवश्यक ठरणार नाही. राज्य मंडळाची इच्छा असल्यास ते बारावी परीक्षा घेऊ शकतात किंवा त्यांना हवे असल्यास ते अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे 12 वीचा निकाल जाहीर करू शकतात. इतर राज्यांनीही येथे बारावी परीक्षा रद्द केल्यास, ज्या विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळू शकेल अशा विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठी असू शकते.(Consolation to over 16 lakh students)

पंतप्रधान मोदींच्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रकाश जावडेकर, पियुष गोयल, धर्मेंद्र प्रधान, निर्मला सीतारमण हे उपस्थित होते. तसेच या व्यतिरिक्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही यात भाग घेतला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments