Cocaine Caught From Zambian Lady :मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कोकेनचा बाजार, चक्क झांबियन महिलेचा हात
Cocaine Caught From Zambian Lady:मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित एक प्रकरण उघडकीस आले आहे.

Cocaine Caught From Zambian Lady: मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित एक प्रकरण उघडकीस आले आहे. शुक्रवारी (26 जून रोजी) मुंबई विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने मोठी कारवाई केली आहे. झांबियाच्या एका महिला प्रवाशाला 700 ग्रॅम कोकेनसह अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार महसूल गुप्तचर संचालनालयाने अदिस अबाबाहून मुंबईमध्ये आलेल्या एका महिलेची चौकशी केली. झांबियन महिलेला 24 जूनला कोकेनची तस्करी केल्याबद्दल अटक केली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये जप्त केलेल्या कोकेनची किंमत भारतीय रुपयांमध्ये 7.35 कोटी रुपये होत असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. झांबियन महिलेला 8 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यापुढे न्यायलयीन कारवाई होईल, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली आहे.
ही महिला मुंबईमध्ये कोणाच्या सांगण्यावरून आली, तसेच ती कोणाला भेटणार होती, किंवा कोकेन कोणाला देणार होती, याचा तपासही काही दिवसांत केला जाणार आहे.