खूप काही

Maharashtra corona Update : महाराष्ट्रात मागील 24 तासात 11,766 नवे कोरोना रुग्ण…

महाराष्ट्रातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या घटली, तर 24 तासात 8104 रुग्णांना डिस्चार्ज.

Maharashtra corona Update : महाराष्ट्रातील कोरोना(Corona) रुग्णांचा आकडा आता कमी होत असताना दिसत आहे. कारण गुरुवारी राज्यात 12 हजारांहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. पण त्या तुलनेत शुक्रवारी नव्या रुग्णांमध्येे (Patients) थोडीशी घट झालेली दिसून येते. तरीही कोरोनामुक्त (Corona free) झालेल्या रुग्णांपेक्षा कोरोना बाधित झालेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. महाराष्ट्रात मागील 24 तासात 11 हजार 766 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 8104 रुग्णांना डिस्चार्ज (Discharge) देण्यात आलेला आहे.

राज्यातील कारोना बाधित रुग्णांची संख्या 58 लाख 87 हजार 853 वर पोचलेली आहे. व त्यातील 56 लाख 16 हजार 857 रुग्ण कोरोनावरती मात करून घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.05 टक्के झाले आहे. सध्याच्या परिस्थितीत राज्यातील मृत्युदर 1.81 टक्के एवढा आहे. तर राज्यात 1,61,704 कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

मुंबईत गेल्या 24 तासात 696 नवे कोरोना रुग्ण आढळून आलेले आहेत. व 648 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 24 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या 7,15,146 इतकी झालेली आहे. व त्यातील 6,81,946 रुग्णांनी कोरोनावरती मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आत्तापर्यंत 15,145 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments