आपलं शहर

Corona Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी BMC सज्ज, वाचा काय केलेय तयारी

मुंबईत तिसर्‍या लाटेची तयारी सुरु झाली असून अनेक कोव्हिड जंबो सेंटरमध्ये बालरोग वॉर्ड तयार केले जात आहेत.

Corona Third wave:देशातील कोरोनाची साथ काही कमी होण्याचे नाव घेत नाही.त्यादरम्यान कोरोनाच्या संकटाशी संघर्ष करण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महानगरपालिका तत्पर आहे. त्यामुळे आता देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर बृहन्मुंबई महानगरपालिका कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची तयारी करत आहे. दरम्यान, मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील एसआरए के-वेस्ट कोव्हिड सेंटर (SRA K-West Covid Centre) येथे डॉक्टर्स फॉर यू या संस्थेद्वारे बालरोग वार्ड (pediatric ward) सुरू करण्यात आला आहे.(BMC ready for the third wave of Corona)

जोगेश्वरी येथील बालरोग वॉर्डमधून आतापर्यंत, कोरोनातून बरे झालेल्या आणि घरी गेलेल्या 3-17 वर्षाच्या मुलांची संख्या 41 आहे. सध्या या कोव्हिड सेंटरमध्ये 10 वर्षाचा एक मुलगा अॅडमिट आहे. या मुलासह त्याची आईसुद्धा त्याची काळजी घेण्यासाठी तिथे आहे.

त्याचबरोबर या बालरोग वॉर्डात 5 खोल्या बनविण्यात आल्या आहेत. त्यापैकी 2 गंभीर खोल्या (Critical room) आहेत. या गंभीर खोल्यांमध्ये ऑक्सिजन मशीन (Oxygen Machine), व्हेंटिलेटर (ventilater) आणि सर्व सुविधा आहेत तसेच मुलांसाठी बनवलेल्या या खोल्यांमध्ये खेळणीदेखील आणि लहान मुलांना आवडणाऱ्या कार्टूनची चित्रे ठेवण्यात आली आहेत.याचबरोबर खोल्यांमध्ये पालकांच्या राहण्याची सुविधादेखील केली आहेत.

मुंबई महानगरपालिका (BMC) आणि डॉक्टर्स फॉर यू (Doctors For You) संस्थेने एकत्रितपणे बालरोग वार्ड सुरू केला आणि आता मुंबईतील हा पहिला वॉर्ड असेल जो पूर्णपणे मुलांची काळजी घेण्यासाठी डिझाइन केलेला आहे. दुसरीकडे मुंबईत तिसर्‍या लाटेची तयारी सुरु झाली असून अनेक कोव्हिड जंबो सेंटरमध्ये बालरोग वॉर्ड तयार केले जात आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments