आपलं शहर

Corona third Wave : टास्क फोर्सकडून काऊंट डाऊन, या आठवड्यात येणार कोरोनाची तिसरी लाट

महाराष्ट्रातील दुसरी लाट ओसरत असून, आता तिसरी लाट दोन किंवा चार आठवड्यात येईल, टास्क फोर्सचा अंदाज.

Corona third Wave: सध्या कोरोनाची दुसरी लाट ओसरत आहे. दुसरा लाटेने संपूर्ण महाराष्ट्रात थैमान घातले होते. परंतु कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांची संख्या कमी होत असली, तरी देखील आता देशात कोरोना व्हायरसची तिसरी लाट कधीही येऊ शकते, त्यामुळे कोरोनाचे संकट पूर्णपणे गेलेले नाही.

2 किंवा 4 आठवड्यात येऊ शकते कोरोनाची तिसरी लाट
महाराष्ट्रातील दुसरी लाट ओसरत असून, आता तिसरी लाट दोन किंवा चार आठवड्यात येईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हा अंदाज टास्क फोर्सने वर्तवला आहे. उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्सच्या पार पडलेल्या बैठकीमध्ये यादरम्यान चर्चा झाली होती.(The third wave of corona can occur in 2 or 4 weeks)

अनेक राज्य तिसऱ्याला लाटेसाठी सज्ज
कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा वेग जास्त होता, त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा वेग हा दुसऱ्याला लाटेपेक्षा जास्त असणार, असा देखील अंदाज लावण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेचा धोका आधीच वर्तवण्यात आला होता, त्यामुळे अनेक राज्य सध्या तिसऱ्या लाटेशी सामना करण्याच्या तयारीत आहेत.(Many states prepared for the third wave)

ब्रिटनमधील कोरोनाची तिसरी लाट
टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी सांगितले की, ब्रिटनमध्ये दुसरी लाट संपत असतानाच चार आठवड्यात तिसरी लाट आली, त्यामुळे नियमांचे पालन न केल्यास आपल्या समोर ही अशी परिस्थिती उद्भवू शकते. त्याचबरोबर लसीकरणाचा देखील वेग वाढला पाहिजे.(The third wave of corona in Britain)

नियमांचे पालन करणे महत्वाचे
लसीकरण वाढवणे गरजेचे आहे. तिसऱ्या लाटेपासून वाचण्यासाठी लस घेणे, गाईडलाईन्सचे पालन करणे, गर्दी टाळणे, मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे महत्त्वाचे आहे. या नियमांचे पालन न केल्यास तिसरी लाट देखील वेगवान होऊ शकते.(It is important to follow the rules)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments