आपलं शहर

Corona Vaccination :मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी, आजपासून लसीकरण केंद्र चालू

पावसामुळे 2/3 दिवस बंद असलेले लसिकरण आज चालु राहणार.

Corona Vaccination :मुंबईत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस झाला आहे, त्यामुळे अनेक संकटे निर्माण झाली आहेत, तरी याचा परिणाम लसीकरणावर होणार नाही, याची काळजी प्रशासनाने घेतली आहे. पावसामुळे 2/3 दिवस बंद असलेले लसिकरण आज चालु राहणार असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. ऑनलाईन बुकींग करून सकाळी 10 ते 3 दरम्यान लसीकरणाची वेळ घ्यावी, असं पालिका आयुक्तांनी म्हटलं आहे.

बीकेसीमध्ये लसीकरणाची तयारी :
लसीकरणासाठी पुन्हा मंडप उभारला जात आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे बीकेसीतील कोव्हिड सेंटरचं नुकसान झाले होते, आता पुन्हा दोन भव्य मंडप उभारले असून यावेळी नागरिकांना एकाच वेळी लसीकरण दिले जाणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.

45 च्या वरील 80 टक्के लोकांना पहिला डोस दिला असून दुसरा डोस देण्याची तयारी सुरु आहे. 18 ते 44 दरम्यानच्या वयोगटाला पहिला डोस दिला जाईल. तसेच ज्यांना दुसरा डोस घ्यायचा असेल, त्यांनी पहिला डोस दिल्याचे प्रमाणपत्र सोबत घेऊन यायचे आहे.

आत्तापर्यंत झालेले लसीकरण :

मुंबईत सोमवारी एका दिवसाला 94 हजार 941 डोस देण्यात आलेत. सरकारी सेंटरपेक्षा खाजगी हॉस्पिटलमध्ये लसीकरण जास्त होत आहे. 75 टक्के लसिकरण हे खाजगी हॉस्पिटलमध्ये केले गेले, गेल्या दहा-बारा दिवसात साडेचार लाख लस खासगी सेंटरमधून तर सरकारी सेंटरमधून 1.8 लाख लसीकरण झाले आहे.

लस्सी च्या किंमती किती?

सरकारने लसीकरण मोफत केले असूनही खाजगी दवाखान्यात लस घेण्यासाठी पैसे आकारले जात आ्हेत. कोवीशिल्डची लस घेण्यासाठी 900 ते 1200 रुपये द्यावे लागतात, तर दुसरीकडे कोवक्सिनची लस घेण्यासाठी 1500 ते 1250 रुपये खर्च करावे लागत असल्याची माहिती समोर आली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments