आपलं शहर

Corona Virus:कोरोनाची तिसरी लाट येण्याआधी BMC ची तयारी पूर्ण

Corona Virus:घाटकोपर येथील वृक्षरोपण कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुंबईतील कोरोना रुग्णांसह कोरोनाचा तिसऱ्या लाटेबद्दल माहिती दिली आहे

Corona Virus:घाटकोपर येथील वृक्षरोपण कार्यक्रमात महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी मुंबईतील कोरोना रुग्णांसह कोरोनाचा तिसऱ्या लाटेबद्दल माहिती दिली आहे.

मुंबईमध्ये सध्या डेल्टाचे 70 रुग्ण आढळले आहेत, मुंबई महानगर पालिका (BMC) कोरोनाच्या तिसऱ्या लाटे साठी पूर्ण पणे सज्ज आहे .

महापालिकेने तिसऱ्या लाटेसाठी रुग्णालय, बेड्स, ऑक्सिजनची सुविधा पूर्ण केली आहे, लहान मुलांसाठी विशेष उपचाराची व्यवस्था देखील करण्यात आली आहे, मुंबईच्या मालाडमध्येही 2000 हून अधिक खाटांचे रुग्णालय उभारण्यात आलं आहे. सोबतच आधीच्या कोव्हिड सेन्टरमध्येही सुविधा सज्ज करण्यात आल्याची माहिती किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.

मुंबईकर कोरोना नियमांचे चांगल्या प्रकारे पालन करत आहेत, आता मुंबईकरही कोरोनाला काही प्रमाणात घाबरत असल्याने ते स्वतः त्याची काळजी घेत असल्याचे, पेडणेकर यांनी म्हटलं आहे.

भाजप नेत्यांनी पालिकेवर उठवलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना किशोरी पेडणेकर भडकल्या आहेत, आता भाजपच्या नेत्यांनी चूप बसावं, तुम्ही शांत राहिलात तर सर्वच वाचतील, असा टोला महापौरांनी आशिष शेलार यांना लगावला आहे. आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यमातून पालिकेवर सवाल उपस्थित केला होता.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments