खूप काही

Corona virus update : चांगली बातमी, मुंबईत कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट; मात्र…

मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाची 961 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत

Corona virus update :कोरोनाचा कहर महाराष्ट्रात सुरूच आहे, पण आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत थोडीशी घट झाल्याने दिलासा मिळाला आहे. काल राज्यात कोरोनाचे 15,169 रुग्ण आढळले आणि 285 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
तर राज्यात एकूण 25,617 कोरोनातून बरे झाले आहेत. ( Good news, the number of corona patients has decreased in Mumbai …)

तर मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाची 961 नवीन प्रकरणे नोंदली गेली आहेत आणि एका दिवसात 27 रुग्णांचा मृत्यू झाला असून 897रुग्ण बरे झाले आहेत. आता मुंबईतील रूग्णांचा रिकव्हरी दर 95 टक्क्यांवर पोहोचला आहे.

सध्या मुंबईत कोरोनाचे 16,612 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आकडेवारीनुसार मुंबईत कोरोनामुळे आतापर्यंत 14,964लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात कोव्हिडमुळे 97,394 लोकांचा मृत्यू झाला आहे तर इतर कारणांमुळे 2,839 लोकांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात सध्या 15,66,690 लोक होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) असून महाराष्ट्रात 7,055 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments