आपलं शहर

Covid-19: कोरोना मृत्यूची आकडेवारी नेमकी कशी मोजली जाते, पाहा A to Z माहिती

राज्याचा कोविड अंतिम अहवाल कसा तयार केला जातो?

Covid-19: कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या आकडेवारीत गडबड झाल्याची बातमी समोर अली होती. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची आकडेवारी लपवून ठेवत असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी लावला होता. त्यांच्या माहितीप्रमाणे महानगरपालिकेने सांगितलेला मृतांचा आकडा चुकीचा होता.

देशभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत आणि मृतांच्या संख्येत वाढ-घट होत असते. त्यामुळे त्याची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. सात्विक सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत आहे. त्याचबरोबर अहवालासाठी अनेक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतात. अहवाल बनवताना अनेक अडचणी येत असतात.

आकडेवारीच्या नोंदणीसाठी दोन टप्पे
कोरोनाचे रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीची नोंद करण्याच्या प्रक्रियेत दोन टप्पे असतात. तांत्रिक अडचणीमुळे माहितीत कधी कधी चुका होतात. कोरोना रुग्णांचा आकडा, कोरोना रुग्णांचा मृतांचा आकडा याची पूर्ण तपशील दररोज जिल्हा आणि मनपा यांच्याकडे पाठवावी लागते.(There are two stages in the process of recording corona patient and mortality statistics)

कोविड रिपोर्टिंगसाठी या पोर्टलचा वापर करतात
कोविड रिपोर्टिंगसाठी दोन पोर्टल वापरतात. आय. सी. एम. आर.(ICMR) चे सी व्ही(CV) पोर्टल. हे पोर्टल कोरोना रुग्णांच्या माहितीची नोंद करण्यासाठी वापरले जाते. तर covid-19 हे पोर्टल मृतांच्या माहितीसाठी वापरली जाते. त्याचबरोबर प्रयोगशाळांसाठी देखील एक स्वतंत्र पोर्टल बनवण्यात आले आहे. आर. टी. आर. ॲप प्रयोगशाळांसाठी वापरले जाते, तर रुग्णांसाठी फॅसिलिटी ॲप वापरण्यात येते.(uses this portal for covid reporting)

राज्याचा अंतिम अहवाल कसा तयार केला जातो?
राज्याचा दैनंदिन अहवालात कोरोना रुग्णांची यादी आय. सी. एम. आर.(ICMR) पोर्टलवरून 12 च्या आत डाउनलोड करण्यात येते, तर मृतांची यादी covid-19 च्या पोर्टल वरून डाउनलोड करण्यात येते. या यादीमधील राज्य आणि जिल्हा या दोन्ही ठिकाणी नोंद असलेल्या रुग्णांना वगळण्यात येते आणि बाधित रुग्ण आणि मृतांची माहिती सर्व जिल्ह्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत राज्य कार्यालयात पाठवावी लागते.

या माहितीच्या आधारेच प्रेस नेट आणि राज्याचा अंतिम अहवाल तयार केला जातो. ही दोन्ही पोर्टल वरील माहिती दर पंधरा दिवसांनी बघितली जाते. पोर्टलवरील माहिती आणि राज्य अहवाल यात तुलना केली जाते. आणि काही अडचणींमुळे झालेला फरक दूर केला जातो. त्याला रेकाँसिलिएशन म्हणजेच ताळमेळ प्रक्रिया असे म्हणतात.(How is the final report on the number of corona patients and deaths prepared?)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments