आपलं शहर

Covid-19: BMC ने 3 हजार 577 मृत्यू लपवले, नवा अहवाल समोर; फडणवीसांपेक्षा मोठा आकडा

देवेंद्र फडणवीसांनी जो आरोप लावला होता त्यां आरोपानुसार आरोग्य विभागाने दिलेली मृतांची आकडेवारी चुकीची आहे. मृतांची आकडेवारी 40% ऐवजी 50% आहे.

Covid-19: देशभरातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या आकडेवारीत गडबड झाल्याची बातमी समोर अली आहे. मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची आकडेवारी लपवून ठेवत असल्याचा आरोप सतत विरोधी पक्ष करत होते. त्यामुळे या आरोपानंतर टीव्ही 9 भारतवर्षने याचा तपास केला. तपासानंतर अतिशय धक्कादायक अशी गोष्ट समोर आली आहे.

महानगरपालिका 40% मृतांचा आकडा लपवत आहे
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस सतत कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूचा आकडा खोटा असल्याचा आरोप करत होते. त्यांनी अनेकदा बीएमसीने जाहीर केलेल्या मृतांच्या आकडेवारी बद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत.(The bmc is hiding the 40% death toll)

त्याचबरोबर शुक्रवारी त्यांनी नागपुरमधील एका प्रेस कॉन्फरन्समध्ये असा आरोप लावला की, मुंबई महानगरपालिका 40% मृतांचा आकडा लपवत आहे. मागील महिन्यात 1 मेपासून ते 31 मेपर्यंत कोरोनामुळे मरण पावलेल्या 1,723 लोकांच्या मृत्यूची नोंद केली होती. परंतु मृतांची संख्या यापेक्षा जास्त आहे.(BMC hid the death toll of 3,577 people)

मृतांची आकडेवारी 40% नसून 50%
टीव्ही 9 भारतवर्षने बीएमसीच्या हेल्थ विभागातील 201 अंतिमसंस्कार स्थळांवर जाऊन मृतांची डिटेल मागितली. स्मशान भूमी, कब्रिस्तान आणि क्रिश्चन सेमेट्री इत्यादी ठिकाणांचा त्यांनी तपशील घेतला. देवेंद्र फडणवीसांनी जो आरोप लावला होता त्यां आरोपानुसार आरोग्य विभागाने दिलेली मृतांची आकडेवारी चुकीची आहे. मृतांची आकडेवारी 40 टक्के ऐवजी 50 टक्के असल्याचे समोर आले आहे.(The death toll is 50%, not 40%.)

3 हजार 577 मृतांचा आकडा लपवण्यात आला.
देवेंद्र फडणीस यांनी जेव्हा बीएमसीवर आरोप केले होते, तेव्हा मुंबईच्या महापौर म्हणाल्या की, हा बीएमसीच्या चांगल्या कामाला चुकीचे दाखवण्याचा प्रयत्न आहे. 1 मेपासून 31 मेपर्यंत मुंबईमध्ये 1,723 मृतांची नोंद केली गेली होती. परंतु कोरोनाने मृत्यू झालेल्या लोकांची खरी संख्या 3 हजार 577 आहे. टीव्ही 9 च्या तपासणीमुळे देवेंद्र फडणीस यांनी बीएमसीवर लावलेले आरोप खरे असल्याचे आढळले.(The allegation made by Devendra Fadnis against BMC for hiding the death toll was found to be true)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments