आपलं शहर

Covid-19: तिसऱ्या लाटेसाठी मुख्यमंत्र्यांच्या नव्या सुचना, प्रिप्लॅनिंगला सुरुवात

तिसरी लाट येण्याआधी करा आरोग्य सेवांमध्ये सुधारणा- उद्धव ठाकरे

Covid-19: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जबरदस्त फटका महाराष्ट्राला बसला होता. ऑक्सिजनची कमी निर्माण झाली होती कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे अनेक लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला होता त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे आतापासूनच सुविधांमध्ये सुधारणा करावी लागणार .

आरोग्य सुविधांमध्ये करा सुधारणा
दुसऱ्या लाटेमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली होती ती परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये म्हणून, तिसरी लाट येण्याअगोदरच आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करणे गरजेचे आहे. 4 जूनला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डिजिटल माध्यमातून सांगितले की, तिसऱ्या लाटेतून बचाव करण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा केल्या पाहिजे.(The Chief Minister said improve health facilities)

सरकार जिल्हा प्रशासनाला करणार मदत
उद्धव ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे ऑक्सीजन प्लांटचे डिजिटल माध्यमातून उद्घाटन केले. त्या दरम्यान मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांचे सरकार जिल्हा प्रशासनाला लागेल ती मदत करेल. सध्या आरोग्य संबंधात महत्त्वाच्या सुविधांमध्ये सुधारणा करणे हे सरकारचे प्राथमिक काम आहे.(The government will help the district administration)

तिसऱ्या लाटेची तयारी आतापासूनच सुरू करावी
त्याचबरोबर त्यांनी सांगितले की, जिल्हाधिकाऱ्यांनी ऑक्सिजन उत्पादन क्षमता आणि कोविड चाचणी सुविधांमध्ये देखील वाढ करावी. त्याचबरोबर त्यांनी असेही सांगितले की, जिल्हा प्रशासनाने आत्ताच तिसऱ्या लाटेची तयारी सुरू केली पाहिजे. जेणेकरून तिसरी लाट येताच तिला नियंत्रणात आणता येईल.(Preparations for the third wave should start now)

मुख्यमंत्र्यांनी दिले आश्वासन
कोरोनाच्या दुसऱ्याला लाटे दरम्यान ऑक्सिजनची कमतरता निर्माण झाली होती. तशी यावेळेस ऑक्सिजनची कमतरता निर्माण होऊ नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यांमध्ये ऑक्सिजनचा साठा करून ठेवावा. तयाचबरोबर आरोग्य सुविधा मजबूत करण्यासाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी दिले आहे.(Uddhav Thackeray has also assured that the government will do its utmost to strengthen health facilities.)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments