आपलं शहर

Covid Centers Updates: मुंबईत उभारलं 35 दिवसात 2170 खाटांचं हॉस्पिटल, तिसऱ्या लाटेची पहिली तयारी…

महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी सरकार विशेष व्यवस्था करत आहे.

Covid Centers Updates : महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आल्यामुळे तिसर्‍या लाटेला सामोरे जाण्याची तयारी तीव्र झाली आहे. या मोहिमेमध्ये मुंबईत 2170 खाटांचे नवीन जांबो कोविड सेंटर    ( jambo covid center) तयार करण्यात आले आहे, तेही अवघ्या 35 दिवसांमध्ये. हे सेंटर मुंबईच्या मालाडमध्ये उभारण्यात आलेलं आहे. इको-फ्रेंडली आणि आगीपासून पूर्णपणे सुरक्षित असलेल्या जर्मन तंत्रज्ञानाच्या आधारावर हे जम्बो कोव्हिड सेंटर उभारण्यात आलं आहे.(covid centers updates 2170 bed hospital set up in mumbai in 35 days first preparations for the third wave).

या जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये लहान मुलांसाठी 42 आयसीयू बेड्स आणि डायलिसिस युनिटसाठी 20 बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त 40 बेड ट्रीजेससाठी असणार आहेत. या केंद्रातील 70 टक्के बेड्समध्ये ऑक्सिजन पुरवण्याची सोय आहे आणि 384 बेडच्या वेगळ्या खोल्यादेखील येथे बनवण्यात आल्या आहेत. येथे 240 सीसीटीव्ही कॅमेरेदेखील बसवले आहेत. जेणेकरून प्रत्येक घटनेवर 24 तास लक्ष ठेवता येईल.The COVID-19 hospital in ICU for children, a( 20-bed dialysis unit, a 40-bed triage and a 384-bed isolation room)

हे जम्बो कोव्हिड सेंटर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Udhav thackeray) यांच्या उपस्थितीत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट केले की, “मालाडमधील जम्बो कोविड रुग्णालय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीएमसीकडे सोपवण्यात आले आहे. 2170 कोव्हिड बेड असलेल्या या रूग्णालयात ऑक्सिजन बेड, आयसीयू, बालरोग आयसीयू, डायलिसिस आणि इतर अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा सुरु केल्या आहेत.(The COVID-19 hospital has a bed ICU,  beds with oxygen facility, an ICU for children, bed dialysis unit, bed triage and bed isolation room with a total of 2,170 beds, the MMRDA said in a release.)

महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्रात कोरोनाचे 60 लाखाहून अधिक रुग्ण आढळले आहेत. तर 1.21 लाखाहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात काळ्या बुरशीचे 8646 प्रकरणेही समोर आली आहेत. महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला तोंड देण्यासाठी सरकार विशेष व्यवस्था करत आहे. विशेषत: तिसऱ्या लाटेतील मुलांवरील धोका लक्षात घेता, त्यांच्या उपचारासंदर्भात आवश्यक त्या व्यवस्था केल्या जात आहेत.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments