आपलं शहर

Covid 19 Updates :मुंबईत कुठल्या ठिकाणी होणार लसीकरण, पाहा संपूर्ण यादी.

45 वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण केले जाणार आहे.

Covid 19 Updates :कोरोनाची दुसरी लाट संपली असून आता तिसऱ्या लाटेला नागरिकांना सामोरे जावे लागणार आहे. करोनाची रुग्ण संख्या कमी झाल्याने कोरोना प्रतिबंधक लसीकरण युद्धपातळीवर राबवणे गरजेचे असल्याचे पालिका अधिकाऱ्यांकडून म्हटले जात आहे.( Where to get vaccinated in Mumbai, see full list.)

बुधवारी (30 june) रोजी मुंबई शहरात 18 ते 45 वयोगटाचे लसीकरण करण्यात येणार आहे. तसेच 45 वर्षांवरील नागरिकांना देखील लसीकरण केले जाणार आहे. महानगरपालिकेने कोरोनातील तिसऱ्या लाटेची शक्यता आता व्यक्त केली. त्याचबरोबर राज्यात कोरोनाच्या डेल्टा आणि डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे राज्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.(vaccination in mumbai city on wednesday will take place for age between the 18 to 44and those above 45)

बृहन्मुंबई महानगरपालिकेने सांगितले की “दोन्ही वयोगटांचे लसीकरण हे 100 % केले जाईल, तसेच यासाठी 100 केंद्रांची नेमणूक महानगरपालिकेने केली आहे. कोरोनाचे कोविशील्ड (covidshild )आणि कोव्हक्सिन (covacin) या दोन लस उपलब्ध करून दिल्या जातील परंतु हे लसीकरण 50 टक्के कोव्हिड अॅपवर ऑनलाईन रजिस्टर करुन आणि 50 टक्के ऑन द स्पॉट नोंदणी करणाऱ्यांसाठी देण्यात येईल.

महानगरपालिकेने आता कोरोनाची पहिली आणि दुसरा डोस 45 वयोगटावरील अधिक लोकांना दिली जाईल मात्र 18 अधिक वय असणाऱ्या लोकांना फक्त पहिला डोस दिला जाईल. परदेशांत शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी, टोकिया ऑलम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या नागरिकांसाठी दुसरा डोसदेखील दिला जाईल, याची व्यवस्था महानगरपालिकेने केलेली आहे. या लोकांना कोविशिल्डचा दुसरा डोस हा पहिल्या डोसच्या 28 दिवस पूर्ण झाल्यास दिल्या जाईल. तसेच दुसरा डोस आरोग्यसेवा आणि फ्रन्टलाइन कामगारांना दिला जाईल.

लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत दिली आहे. नागरिकांना कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल तसेच जास्तीत जास्त प्रमाणात लसीकरण करण्याचा प्रयत्न महानगरपालिका करत असल्याची माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments