आपलं शहर

CSMT Redevelopment : CSMT चा होणार पुनर्विकास, अडाणीसह 9 बड्या कंपन्या कॉन्ट्रॅक्टच्या रांगेत…

CSMT स्टेशनच्या पुनर्विकासासाठी IRSDCने 9 कंपन्यांना शॉर्टलिस्ट केले आहे.

CSMT Redevelopment : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus – CSMT) पुनर्विकासासाठी अडाणी रेल्वेज (Adani Railways), जीएमआर एंटरप्राईजेस (GMR Enterprises private limited), ओबेरॉय रियल्टी (Oberoy realty) अशा 9 कंपन्यांनी बोली लावली आहे. सीएसएमटी स्थानकाचा पुनर्विकास हा भारतीय रेल्वेच्या स्टेशनला ‘रेलोपोलिस’मध्ये (railopolis) रुपांतरित करण्याच्या योजनेचा एक भाग आहे.

रेलोपोलिस म्हणजे काय?

रेलोपोलिस म्हणजे एक लहान आधुनिक शहर जिथे लोक राहू शकतात, काम करू शकतात, खेळू शकतात यामुळेच येथे प्रचंड गुंतवणूक आणि व्यवसायाच्या संधी निर्माण होण्याची शक्यता असते, अशी माहिती भारतीय रेल्वे स्टेशन विकास महामंडळाने (IRSDC) मंगळवारी दिली.

कंत्राटदारांमध्ये कोणाचा समावेश..

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे रेल्वे स्टेशन पुनर्विकसित झाल्यानंतर रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सुविधा पुरवल्या जातील आणि प्रवाशांचा प्रवासदेखील सुखकर होईल. तर या आयकॉनिक स्टेशनच्या पुनर्विकासासाठी बोली लावलेल्या इतर कंपन्यांमध्ये गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेड (Godrej properties limited), कल्पतरू पॉवर ट्रान्समिशन लिमिटेड (Kalpataru Power transmission), मोरीबस होल्डिंग्ज प्रायव्हेट लिमिटेड (Moribus Holdings) आणि बीआयएफ आयवी इन्फ्रास्ट्रक्चर होल्डिंग डीआयएफसी प्रायव्हेट लिमिटेड (BIF IV Infrastructure Holding DIFC) यांचा समावेश आहे.

आतापर्यंत 9 कंपन्यांनी सीएसएमटी (CSMT) स्थानकाच्या पुनर्विकासासाठी रिक्वेस्ट फॉर कोटेशन (RFQ) टप्पा पास केला आहे. तर आयआरएसडीसी (IRSDC) आता लवकरच या कंपन्यांसाठी रिक्वेस्ट फॉर प्रपोजल (RFP) आणेल. सीएसएमटी रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास हा अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्पांपैकी एक आहे त्यामुळे आयआरएसडीसी या स्टेशनला अत्याधुनिक परिवहन केंद्रात रूपांतरित करण्यास वचनबद्ध आहे असे आयआरएसडीसीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी एस.के लोहिया (IRSDC Managing Director SK Lohia) यांनी सांगितले.

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments