आपलं शहर

Dharavi corona cases today : धारावीचे यश, 24 तासात एकही कोरोना रुग्ण नाही

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावी भागात 24 तासांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.

Dharavi corona cases today: दिवसेंदिवस मुंबईमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना पाहायला मिळत आहे, त्याचबरोबर रिकवरी रेट देखील वाढत आहे. कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या धारावीमध्ये मागील 24 तासात कोरोनाच्या एकही रुग्णांचा मृत्यू झालेला नाही.

मागील 24 तासात धारावीमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण नाही
मागील वर्षीच्या पहिल्या लाटेमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे धारावीला हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले होते. त्याच धारावीबद्दल एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणाऱ्या धारावी भागात 24 तासांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही.(No corona patient has been found in Dharavi in ​​the last 24 hours)

धारावीमध्ये कोरोना रुग्ण संख्या वाढताना पाहायला मिळत होती. परंतु पालिकेने आरोग्य यंत्रणा, पालिका कर्मचारी, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या सहकार्यानेमुळे कोरोना विरोधात दिलेला लढा यशस्वी ठरल्याचे दिसते.

मुंबईचा रिकवरी रेट 95%
मुंबईत आतापर्यंत 6 लाख 84 हजार 107 रुग्ण बरे होऊन घरी पाठवण्यात आले आहेत, तर मुंबईचा रिकवरी रेट देखील 95 टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. तर रुग्ण वाढीचा दर 0.10 टक्के इतका झाला आहे सध्या मुंबईमधील 15 हजार 550 ऍक्टव कोरोना केसेस आहेत. या रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार चालू आहे.(Mumbai’s recovery rate 95%)

महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या
महाराष्ट्रात मागील 24 तासात 8 हजार 129 नवीन कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्याचबरोबर 24 तासात 200 कोरोनाबधितांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 56 लाख 54 हजार 003 आहे, तर 200 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे(Total number of corona patients in Maharashtra)

Related Articles

Subscribe
Notify of
guest
0 Comments
Inline Feedbacks
View all comments